-
देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. (Express Photo by Pradeep Kumar)
-
देशात करोनाची बाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजूनही कायम आहे. (Express Photo by Pradeep Kumar)
-
तिसऱ्या लाटेबाबत सतत शक्यता वर्तवली जात असताना लोकांनी याकडे दुर्लक्ष केले तर पुन्हा रुग्णसंख्या वाढू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशी काही राज्ये आहेत जिथे अद्याप लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. (PTI Photo)
-
दुसरीकडे, उकाड्यातून सुटका व्हावी यासाठी हिमाचल प्रदेशच्या मनाली येथे पर्यटक येत आहेत. (PTI Photo)
-
दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील कोविड -१९ रुग्णांमध्ये घट झाली आहे. (PTI Photo)
-
गेल्या महिन्यात राज्य सरकारने करोना निर्बंधाबाबत शिथिलता घोषणा केल्यापासून पर्यटकांनी कुल्लू-मनाली आणि धर्मशालाकडे उंचीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Express Photo by Pradeep Kumar)
-
पर्यटकांच्या या अचानक वाढीमुळे मनालीच्या रस्त्यांवरील गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून अधिकारी व स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (PTI Photo)
-
आरटी-पीसीआर अहवाल आणि राज्यात प्रवेश करण्यासाठी ई-कोविड पासची अट मागे घेतल्यामुळे धोक्यात वाढ झाली आहे. (PTI Photo)
-
कोविड नियमांचे सर्सास उल्लंघन करुन तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले जात आहे. (Express Photo by Pradeep Kumar)
-
देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७.२२ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात ३९ हजार ६४९ करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर सध्या देशात ४ लाख ५० हजार ८९९ रुग्ण उपचार घेत आहेत. (PTI Photo)
करोनावर ‘पर्यटन लाटे’ची मात! गर्दी बघून सरकारचीही उडाली झोप
Web Title: Corona pandemic hill station himachal pradesh shimla manali tourist huge crowd pleasant weather see photos sdn