Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. corona pandemic huge rush pune district weekend lockdown tourist picnic waterfall police important information before travelling pune sdn 96 bmh

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर फिरायला जात असाल, तर थांबा; आधी हे वाचा…

July 17, 2021 12:51 IST
Follow Us
  • करोना पुन्हा एकदा डोकं वर काढण्याच्या तयारीत असून, तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. महाराष्ट्रातही सरकारने पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनानं काही कठोर निर्णय घेतले आहे. पावसाळा सुरू झाल्यानं पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी जाण्यासाठी कडक नियमावली जारी केली आहे.
    1/10

    करोना पुन्हा एकदा डोकं वर काढण्याच्या तयारीत असून, तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. महाराष्ट्रातही सरकारने पावलं उचलण्यास सुरूवात केली असून, यापार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनानं काही कठोर निर्णय घेतले आहे. पावसाळा सुरू झाल्यानं पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी जाण्यासाठी कडक नियमावली जारी केली आहे.

  • 2/10

    करोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. तसेच, धबधब्यांच्या ठिकाणापासून एक किलोमीटरच्या परिसरात वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

  • 3/10

    गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह पुणे जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना आवाहनही केलं होतं. मात्र, गर्दी कायम दिसून येत असल्यानं आजपासून (१६ जुलै) नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)

  • 4/10

    भूशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदिर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धरण या पर्यटन ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)

  • 5/10

    पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना याठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच वेगानं वाहणाऱ्या पाण्यात उतरणं, खोल पाण्यात उतरणं व पोहणे यालाही मज्जाव करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)

  • 6/10

    धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)

  • 7/10

    धबधबा परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचबरोबर मद्य बाळगणं,मद्यवाहतुक करणं, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करून रस्त्यावर व धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवल्यास कारवाई केली जाणार आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)

  • 8/10

    वाहनांची ने-आण करताना बेजबाबदारपणे वाहन चालवणं, धोकादायक स्थितीत वाहन ओव्हरटेक करणं, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थरमाकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)

  • 9/10

    सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणं, टिंगल टवाळी करणं, महिलांशी असभ्य वर्तन करणं, असभ्य हावभाव करणं, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असं कोणतंही वर्तन करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)

  • 10/10

    गर्दी होत असलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आलं असून, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. त्याचबरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केलं आहे.

Web Title: Corona pandemic huge rush pune district weekend lockdown tourist picnic waterfall police important information before travelling pune sdn 96 bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.