-
जगभरात अनेकवेळा विविध चक्रीवादळाच्या निर्मिती होतात आणि त्यांचा प्रवास खंडप्रहाय दिशेनं सुरू होतो.
-
अशा चक्रीवादलांचा फटका मानवी जीवनासह अन्य जीवशास्त्रीय घटकांनाही बसतो.
-
यंदा देशात ऐन मान्सूनच्या आगमनाच्या तोंडावर रेमल नावाचे चक्रीवादळ धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
-
मोसमी पावसाचं गणित रेमल चक्रीवादळ बिघडवणार का? सरासरी पाऊस होणार की नेमकं काय होणार हा प्रश्न? आता उपस्थित होत आहे.
-
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीत हे वादळ काही तासांतच बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवली आहे.
-
दरम्यान, ‘रेमल’ हे नाव या चक्रीवादळाला सर्वात आधी कोणी दिलं? या नावाचा अर्थ काय होतो, हे जाणून घेऊ
-
उष्णकटिबंधीय भागातून तयार होणाऱ्या वादळाच्या प्रकारात मोडत असलेलं हे चक्रीवादळ, सर्वात प्रथम ओमानमध्ये २०२४ च्या मान्सून हंगामापूर्वीच दाखल होणार आहे.
-
त्यामुळं ओमान देशाच्या हवामानखात्याने या वादळाला एक नाव द्यायचं ठरवलं आणि ‘रेमल’ असं नाव त्यांनी या चक्रीवादळाला दिलं आहे. अरबी भाषेत ” या नावाचा अर्थ ‘वाळू’ असा होतो.
-
दरम्यान, येत्या २४ तासात चक्रीवादळामुळे हवामानावर आणखी परिणाम दिसून येतील. महाराष्ट्रावर मात्र या चक्रीवादळाचा थेट परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. (सर्व फोटो प्रतीकात्मक आणि लोकसत्ता संग्रहित)
Cyclone Remal : रेमल चक्रीवादळातील ‘रेमल’ नावाचा अर्थ काय; कोणी दिलंय हे नाव?
निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ अशा वादळांनंतर आता रेमल नामक नवीन वादळ येऊन ठेपलंय, याबद्दल जाणून घेऊ.
Web Title: Cyclone remal to hit bengal how and whats the meaning of cyclone name spl