Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. loksabha elections 2004 exit polls what happened in 2004 general elections in india spl

Lok Sabha Exit Poll : एक्झिट पोल्सचे अंदाज नेहमी खरे ठरतात का; २००४ साली काय घडलेलं?

Lok Sabha Exit Pollकाय होते २००४ च्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज? याबद्दल जाणून घेऊयात

June 3, 2024 10:36 IST
Follow Us
  • loksabha elections 2004 exit polls
    1/13

    नुकतंच लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. त्यानंतर देशभरामध्ये एक्झिट पोल म्हणजेच अंदाज वर्तवले जात आहेत. विविध संस्थांकडून हे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

  • 2/13

    या सर्व अंदाजामध्ये भाजपाच्या एनडीए आघाडीला पुन्हा एकदा संधी मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

  • 3/13

    दरम्यान, २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज काय होते आणि निकाल काय लागला होता? हे या निमित्ताने चर्चेत आले आहे.

  • 4/13

    कारण, २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अंदाजामध्ये भाजपाला बहुमत मिळत असल्याचं वर्तवण्यात आलं होतं.

  • 5/13

    परंतु जेव्हा निकाल घोषित झाले त्यावेळेला काँग्रेसला आणि त्या वेळच्या यूपीएला जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसचं सरकार देशामध्ये स्थापन झालं होतं.

  • 6/13

    त्यामुळे याही निकालाची स्थिती नेमकी काय असेल? जे अंदाज वर्तवण्यात आले आहे ते खरे ठरणार का? निकाल आणि अंदाज सारखेच असतील की वेगळे? हे आपल्याला निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

  • 7/13

    काय होते २००४ च्या लोकसभा निवडणुकीचे अंदाज?

  • 8/13

    २००४ साली लोकसभा निवडणुकीच्या अंदाजांमध्ये आजतक या संस्थेने एनडीएला २४८ जागा यूपीएला १९० आणि इतर १०५ जागांचा अंदाज दाखवला होता.

  • 9/13

    २००४ साली लोकसभा निवडणुकीच्या अंदाजांमध्ये एनडीटिव्ही या संस्थेने एनडीएला २३० ते २५० जागा तर यूपीएला १९० ते २०५ आणि इतर १०० ते १२० जागा दाखवल्या होत्या.

  • 10/13

    तर २००४ साली लोकसभा निवडणुकीच्या अंदाजांमध्ये सी-वोटर या संस्थेने भाजपाला २६३ ते २७५ जागा काँग्रेसला १७४ ते १८६ आणि इतर ८६ ते ९८ जागा दाखवल्या होत्या.

  • 11/13

    प्रत्यक्षपणे निकाल आल्यानंतर मात्र, एनडीएला १८१ जागा मिळाल्या आणि यूपीएला मिळाल्या होत्या २०८ जागा तर अन्य पक्षांच्या खात्यात गेल्या होत्या १५४ जागा.

  • 12/13

    त्यानंतर देशामध्ये यूपीए आणि अन्य यांनी मिळून सत्ता स्थापन केली. त्यावेळी पंतप्रधान पदावर डॉ. मनमोहन सिंग यांना संधी मिळाली.

  • 13/13

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित) हे देखील पहा- कोणी मतदानासाठी चक्क घोड्यावरून पोहचलं तर जवानांनी, खेळाडूंनी आणि पुढाऱ्यांनी लावल्या रांगा; फोटो पाहून व्हाल थक्क

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Loksabha elections 2004 exit polls what happened in 2004 general elections in india spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.