-
राज्यात उद्यापासून म्हणजेच ९ ऑगस्टपासून ‘ हर घर तिरंगा अभियान’ राबवले जाणार आहे.
-
येत्या १५ ऑगस्ट रोजी देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिवस आहे.
-
त्याच पार्श्वभूमीवर आता ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्णय मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
-
या कालावधीत राज्यातील अडीच कोटी घरे व आस्थापनांवर तिरंगा ध्वज फडकवला जाईल.
-
याशिवाय या कालावधीत विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
-
हर घर तिरंगा या अभियानाची सुरुवात उद्या ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत.
-
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानातून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात होणार आहे.
-
दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २०२२ मध्ये केंद्र सरकारने हर घर तिरंगा मोहीम राबवली होती. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले होते.
-
या मोहिमेत देशभरातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, या मोहिमेत सुमारे ५०० कोटी रुपयांच्या तिरंग्याची विक्री झाली होती. (सर्व फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या फेसबुक पेजवरून साभार) हे देखील वाचा: शिवसेना उबाठाची दिल्लीवारी; उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट
Independence Day 2024 : राज्यात ९ ऑगस्ट पासून ‘हर घर तिरंगा’ अभियान; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्य सरकारकडून ९ ऑगस्ट पासून ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा.
Web Title: Chief minister eknath shinde announced har ghar tiranga campaign in the state from august 9 spl