• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. when did manmohan singh became finance minister and rbi governor degrees and posts spl

डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्री आणि RBI गव्हर्नर कधी झाले होते? ‘या’ महत्वाच्या पदांवर केले काम

Manmohan Singh Degrees and posts: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आता या जगात नाहीत. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान भारतीय कधीही विसरणार नाहीत.

December 27, 2024 11:49 IST
Follow Us
  • Manmohan Singh Post
    1/15

    देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काल (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 2/15

    मनमोहन सिंग हे दोनदा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. यासोबतच ते आरबीआयचे गव्हर्नर आणि देशाचे अर्थमंत्रीही राहिले आहेत. मनमोहन सिंग हे एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ तसेच एक अद्भुत नेते होते. देशातील अनेक मोठ्या पदांवर त्यांनी काम केले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 3/15

    मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी गाह, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये) येथे झाला. ते लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं असल्यानं त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले आणि ते त्यांच्या अगदी जवळ होते. मनमोहन सिंग यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण उर्दू माध्यमात झाले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 4/15

    फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतातील हल्द्वानी येथे स्थलांतरित झाले. यानंतर, १९४८ मध्ये त्यांचे कुटुंब अमृतसरला गेले जेथे त्यांनी हिंदू कॉलेज, अमृतसरमधून शिक्षण घेतले. त्यानंतर मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात बीए आणि मास्टर्स केले. संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत ते टॉपर राहिले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 5/15

    त्यानंतर १९५७ मध्ये मनमोहन सिंग केंब्रिज युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी गेले आणि तेथून त्यांनी इकॉनॉमिक्स ट्रायपोस केले. ते सेंट जॉन्स कॉलेजचे सदस्य होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 6/15

    केंब्रिजनंतर मनमोहन सिंग भारतात परतले आणि पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. यानंतर त्यांनी १९६२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून डॉ. फिलची पदवी मिळवली. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 7/15

    डी.फिल. पूर्ण झाल्यावर मनमोहन सिंग भारतात परतले. ते १९५७ ते १९५९ या काळात पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक होते. याव्यतिरिक्त, १९५९ आणि १९६३ दरम्यान, त्यांनी पंजाब विद्यापीठात अर्थशास्त्राचे वाचक म्हणून काम केले आणि १९६३ ते १९६५ पर्यंत ते तेथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 8/15

    मनमोहन सिंग यांनी १९६६ ते १९६९ या कालावधीत युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD) साठी काम केले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 9/15

    मनमोहन सिंग यांची अर्थतज्ञ म्हणून प्रतिभा ओळखून ललित नारायण मिश्रा यांनी त्यांना भारताच्या परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्त केले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 10/15

    यानंतर मनमोहन सिंग १९७२ ते १९७६ या काळात अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 11/15

    मनमोहन सिंग १९७६ ते १९८० पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक होते. या काळात ते इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे संचालकही होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 12/15

    यानंतर, मनमोहन सिंग १९७७ ते १९८० पर्यंत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे (आर्थिक व्यवहार विभाग) सचिव होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 13/15

    १९८२ मध्ये त्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आणि ते १९८५ पर्यंत या पदावर राहिले. यानंतर १९८५ ते १९९० पर्यंत ते भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. यानंतर १९९० ते १९९१ पर्यंत मनमोहन सिंग हे भारताच्या पंतप्रधानांचे आर्थिक बाबींवर सल्लागार होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 14/15

    २१ जून १९९१ रोजी ते भारताचे अर्थमंत्री झाले आणि १५ मे १९९६ पर्यंत ते या पदावर राहिले. मनमोहन सिंग राज्यसभेचे खासदार (१ ऑक्टोबर १९९१ – १४ जून २०१९). त्याचवेळी ते १९९८ ते २००४ या काळात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)

  • 15/15

    यानंतर २२ मे २००४ रोजी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान झाले. मनमोहन सिंग हे दोनदा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. दुसऱ्यांदा २००९ मध्ये ते पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले आणि २६ मे २०१४ पर्यंत ते या पदावर राहिले. (फोटो: इंडियन एक्सप्रेस) हेही पाहा- २ घरं, बँक खात्यातील रक्कम अन्…; माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या संपत्तीबद्दल जाणून घ्या

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: When did manmohan singh became finance minister and rbi governor degrees and posts spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.