• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. india retaliates multiple terror attacks not just pahalgam understand in 8 points spl

फक्त पहलगामच नाही तर भारताने ऑपरेशन सिंदूरमधून पाकिस्तानने केलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला आहे, वाचा…

How India Take Revenge of Multiple Terror Attacks: भारताने केवळ पहलगामच नव्हे तर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. फक्त या ९ ठिकाणीच हल्ले का केले गेले ते जाणून घ्या.

May 7, 2025 18:17 IST
Follow Us
  • India Attack on Pakistan
    1/12

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारतीय हवाई दलाने ६-७ मे च्या रात्री पाकिस्तानवर हवाई हल्ला केला ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. (Photo: AP)

  • 2/12

    भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत आणि ते सर्व उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार, भारतीय हवाई दलाने या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. (Photo: AP)

  • 3/12

    हवाई हल्ल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि नौदलातील अधिकारी विंग कमांडर व्योमिका यांनी या हवाई हल्ल्याची माहिती दिली. (Photo: AP)

  • 4/12

    या हवाई हल्ल्याद्वारे भारताने केवळ पहलगामच नाही तर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी केलेल्या इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेतला आहे. कसे ते जाणून घेऊया: (Photo: AP)

  • 5/12

    १- फक्त दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले करण्यात आले.
    १- फक्त दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले करण्यात आले.
    लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, गेल्या तीन दशकांमध्ये पाकिस्तानने पद्धतशीरपणे कट रचून दहशतवाद्यांना पायाभूत सुविधा पूरवलल्या आहेत. भारताच्या उत्तरेकडील सवाई नाला आणि दक्षिणेकडील बहावलपूर येथे असलेल्या सुप्रसिद्ध दहशतवादी छावण्यांवर कारवाई करण्यात आली आणि कोणत्याही लष्करी आस्थापनाला लक्ष्य करण्यात आले नाही. (Photo: AP)

  • 6/12

    २- हवाई हल्ला कुठे करायचा हे कसे ठरवले गेले?
    या हल्ल्यात, विश्वासार्ह माहितीच्या आधारे निवडलेले 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यात आले आहेत आणि त्यात कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा जीव जाणार नाही याचीही खात्री करण्यात आली. (Photo: ANI)

  • 7/12

    ३- कोणत्या दहशतवादी तळावर प्रथम हवाई हल्ला करण्यात आला?
    भारताने पाकिस्तानमधील पहिला हवाई हल्ला मुझफ्फराबादच्या सवाई नाला कॅम्पमधील सय्यदना बिलाल कॅम्पवर केला, जो लष्कराचा प्रशिक्षण केंद्र आणि बालेकिल्ला होता. (Photo: ANI)

  • 8/12

    4- सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद
    पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसह, सोनमर्ग आणि गुलमर्गच्या दहशतवाद्यांनीही मुझफ्फराबादमधील सय्यदना बिलाल कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले. येथे दहशतवाद्यांना शस्त्रे, स्फोटके आणि जंगलात राहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा परिस्थितीत, भारताने पहलगाम तसेच सोनमर्ग आणि गुलमर्ग येथील दहशतवादी हल्ल्यांचा बदला येथे हवाई हल्ले करून घेतला आहे. (Photo: PTI)

  • 9/12

    5- जाफराबाद, गुरपूर कोटली कॅम्प
    जाफराबादमधील गुरपूर कोटली कॅम्प हे जैश-ए-मोहम्मदचे केंद्र आहे जिथून राजौरी आणि पूंछमध्ये दहशतवादी सक्रिय होते. २०२३ मध्ये पूंछमध्ये यात्रेकरूंवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. यासोबतच, या वर्षी मार्चमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी चार पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती तेदेखील याच छावणीत राहत होते. या हवाई हल्ल्याद्वारे, पूंछ येथील यात्रेकरू आणि पोलिस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा बदला घेण्यात आला. (Photo: PTI)

  • 10/12

    6- महमूना जोया सरजल कॅम्प, सियालकोट
    मार्च २०२५ मध्ये, जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना याच छावणीत प्रशिक्षण देण्यात आले होते. हिजबुल मुजाहिदीनचे महमूना जोया सरजल येथे एक मोठे प्रशिक्षण केंद्र होते. २०१६ मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्याचा कटही याच कॅम्पमधून रचण्यात आला होता. अशा परिस्थितीत, येथे हवाई हल्ला करून भारताने पठाणकोट एअरबेसचा बदलाही घेतला आहे. (Photo: PTI)

  • 11/12

    ७-मरकझ-ए-तैयबा, मुरीदके
    भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीद येथील मरकझ-ए-तैयबाचे दहशतवादी अड्डेही उद्ध्वस्त केले आहेत. येथे जैश दहशतवादी संघटनेचे लपण्याचे ठिकाण होते जे अनेक एकरांवर पसरलेले आहे. मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते, विशेषतः अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. अशा परिस्थितीत, येथे हल्ला करून, भारताने मुंबई हल्ल्याचा बदलाही घेतला आहे. (Photo: PTI)

  • 12/12

    8- मरकज सुहानल्लाह, बहावलपूर
    मरकज सुहानल्लाह हे जैशचे बहावलपूरमधील मुख्यालय होते, जे दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि भरतीचे केंद्र होते. मोठे दहशतवादी येथे येत-जात असत. (Photo: PTI)

TOPICS
ऑपरेशन सिंदूरOperation Sindoorदहशतवादी हल्लाTerror AttackपहलगामPahalgamमराठी बातम्याMarathi News

Web Title: India retaliates multiple terror attacks not just pahalgam understand in 8 points spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.