-
प्रसिद्ध आर्थिक लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतीत संभाव्य घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
-
जर त्यांच्या किमती कमी झाल्या तर या मालमत्ता अधिक खरेदी करण्याची त्यांची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
-
त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे आणि म्हटले की, “बुडबुडे फुटत आहेत, काळजी घ्या.”
-
“रिच डॅड पुअर डॅड” या बेस्ट सेलिंग पुस्तकाचे लेखक कियोसाकी यांचा असा विश्वास आहे की, जेव्हा बाजारातील बुडबुडे फुटतात तेव्हा ते प्रमुख वस्तूंच्या किमती कमी करू शकतात.
-
पण, किंमती कमी झाल्यावर गुंतवणूक करण्यास तयार असलेल्यांसाठी त्यांनी ही “चांगली बातमी” असल्याचे म्हटले आहे.
-
२१ जुलै २०२५ रोजीच्या त्यांच्या पोस्टमध्ये, कियोसाकी यांनी म्हटले की, “जेव्हा बुडबुडे फुटतील तेव्हा सोने, चांदी आणि बिटकॉइन देखील क्रॅश होतील अशी शक्यता आहे. चांगली बातमी अशी की, जर सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमती घसरल्या तर मी खरेदी करेन. काळजी घ्या.”
-
कियोसाकी यांनी किमती कमी झाल्यावर गुंतवणूकदारांनी सोने, चांदी यासारख्या मालमत्ता खरेदी करण्यास बराच काळ प्रोत्साहित केले आहे.
-
जर घसरण झाली तर ते ही रणनीती अवलंबत राहतील असे त्यांनी सांगितले. त्यांच्या अंदाजातून एक सामान्य गुंतवणूक दृष्टिकोन दिसून येतो, आर्थिक मंदीच्या काळात कमी किमतीत मौल्यवान मालमत्ता खरेदी करणे.
-
एक्सवरील मागील पोस्टमध्ये, रॉबर्ट कियोसाकी यांनी भाकीत केले होते की, चांदीच्या किमती त्यांच्या सध्याच्या मूल्याच्या दुप्पट वाढू शकतात, चांदीचे मूल्य खूपच कमी आहे आणि गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणूक योजनांमध्ये त्याचा समावेश करण्याचा विचार करावा. (सर्व फोटो सौजन्य: @theRealKiyosaki/X)
‘बुडबुडे फुटत आहेत, काळजी घ्या’: रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाचा इशारा; म्हणाले, “सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या…”
Rich Dad Poor Dad: कियोसाकी यांनी पारंपारिक पैशांची बचत करणे ही चांगली आर्थिक योजना नसल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. त्यांनी लिहिले की “बचत करणारे तोटेखोर असतात”.
Web Title: Rich dad poor dad author robert kiyosaki warns bitcoin gold silver crash aam