• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. know which gold reserves countries hae highest gold holdings india china us ranking in 2025 rak

Gold Reserves : सर्वाधिक सोन्याचा साठा असणारे देश कोणते? भारताचा क्रमांक कितवा? वाचा संपूर्ण यादी!

सोने फक्त दागिने किंवा संपत्तीचे प्रतिक नाही, तर ते आर्थिक सुरक्षेचा मजबूत स्तंभ देखील आहे.

Updated: October 4, 2025 13:19 IST
Follow Us
  • Gold reserves
    1/9

    सोने फक्त दागिने किंवा संपत्तीचे प्रतिक नाही, तर ते आर्थिक सुरक्षेचा मजबूत स्तंभ देखील आहे. डिजिटल पेमंटच्या युगात देखील सोन्याचे महत्त्व कमी झालेले नाही. ज्या देशांकडे सोन्याचे मोठे साठे असतात त्या देशात महागाई आणि चलनातील चढउतारांपासून संरक्षण मिळते. यामुळे गुंतवणूदारांचा विश्वास वाढतो आणि आर्थिक स्थिरता वाढीस लागते. (फोटो – pexels)

  • 2/9

    अमेरिका

    अमेरिकेकडे २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत ८१३३.४६ टन सोन्याचा साठा आहे. पहिल्या तिमाहीत देखील हा साठा तेवढाच होता. २००० ते २०२५ पर्यंत अमेरिकेचा सरासरी सोन्याचा साठा ८१३४.७८ टन होता. २००१ च्या तिसऱ्या तिमाहीत हा साठा ८१४९.०५ टनांवर पोहोचला. सरकारी सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे.(फोटो – pexels)

  • 3/9

    जर्मनी

    जर्मनीकडे सोन्याचा साठा २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ३३५०.२५ टन आहे, जो पहिल्या तिमाहीत होता त्यापेक्षा थोडा कमी आहे. २००० ते २०२५ सरासरी साठा ३३९८.२८ टन राहिला आहे. २५ वर्षात हा सर्वात खाली आलेला स्तर आहे आणि जर्मनी अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.(फोटो – pexels)

  • 4/9

    इटली

    इटलीने त्यांच्याकडील सोन्याचा साठा सातत्याने राखून ठेवला आहे. २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याचा साठा २४५१.८४ टन होता, जो पहिल्या तिमाहीइतकाच आहे. २००० ते २०२५ पर्यंत सरासरी सोन्याचा साठा २४५१.८४ टन होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा आकडा स्थिर आहे.(फोटो – pexels)

  • 5/9

    फ्रान्स

    २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत फ्रान्सचा सोन्याचा साठा २४३७ टनांवर स्थिर राहिला, जो पहिल्या तिमाहीत इतकाच होता. फ्रान्सकडे २०१२ मध्ये सोन्याचा साठा २४३५.३८ टनांवर घसरला होता. २००२ मध्ये तो ३००० टनांपेक्षा जास्त झाला होता. आता साठा स्थिर होताना दिसत आहे . (फोटो – pexels)

  • 6/9

    रशियाकडे किती सोनं?
    रशियाकडे २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याचा साठा २३२९.६३ टनांवर स्थिर राहिला आहे. २००० ते २०२५ पर्यंत सरासरी सोन्याचा साठा ११८१.८८ टन होता. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत सर्वोच्च पातळी २३३५.८५ टन होती आणि २००० च्या दुसऱ्या तिमाहीत सर्वात कमी ३४३.४१ टन होती. (फोटो – pexels)

  • 7/9

    चीन
    चीनकडे जवळपास २२७९.६ टन सोन्याचा साठा आहे, आणि तो यादीत सहाव्या स्थानावर आहे. (फोटो – pexels)

  • 8/9

    स्वित्झर्लंड

    स्वित्झर्लंडक हा एक छोटासा देश असूनही त्याच्याकडे अंदाजे १०४० टन सोन्याचे साठे आहेत, आणि हा देश यादीत सातव्या क्रमांकावर आहे. स्विस नॅशनल बँक या सोन्याच्या साठ्यांचे व्यवस्थापन करते. (फोटो – pexels)

  • 9/9

    भारत

    भारताकडे २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याचा साठा ८८० टनांवर पोहचला आहे, जो पहिल्या तिमाहीत ८७९.६० टनाहून अधिक होता. २००० ते २०२५ या काळात सरासरी साठा हा ५३१ टन राहिला आहे. २००१ च्या दुसऱ्या तिमाहीत किमान स्तर ३५७.७५ टन होता. भारताचे सोने भांडार सातत्त्याने वाढत आहे. (फोटो – pexels)

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Know which gold reserves countries hae highest gold holdings india china us ranking in 2025 rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.