Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. talwalkar classic 2015 compeition

तळवलकर क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा

December 19, 2015 11:30 IST
Follow Us
  • एकापेक्षा एक सरस पीळदार शरीरयष्टी असलेल्या देशातील अव्वल शरीरसौष्ठवपटूंचा मेळाच ‘तळवलकर क्लासिक’ स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. या स्पर्धेत चांगली चुरस रंगली. (छायाः दिलीप कागडा)
    1/

    एकापेक्षा एक सरस पीळदार शरीरयष्टी असलेल्या देशातील अव्वल शरीरसौष्ठवपटूंचा मेळाच ‘तळवलकर क्लासिक’ स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. या स्पर्धेत चांगली चुरस रंगली. (छायाः दिलीप कागडा)

  • 2/

    शेवटपर्यंत श्वास रोखणाऱ्या या स्पर्धेत अखेर बाजी मारली ती भारतीय रेल्वेच्या राम निवासने. (छायाः दिलीप कागडा)

  • 3/

    या वेळी भारतामध्ये प्रथमच झालेल्या मिश्र जोडी स्पर्धेत महाराष्ट्राची श्वेता राठोर आणि रायन कॅनेल यांनी बाजी मारली. (छायाः दिलीप कागडा)

  • 4/

    या स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यातील अव्वल अशा ३० शरीरसौष्ठवपटूंना निवडण्यात आले होते. त्यामधून अंतिम फेरीसाठी दहा शरीरसौष्ठवपटूंना निवडले गेले. या दहा स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत या वेळी पाहायला मिळाली. (छायाः दिलीप कागडा)

  • लोकांना असे वाटते की, भरपूर आहार घेतल्यावर चांगले पीळदार शरीर होते, पण तसे नाही. आमचा आहार हा सामान्य लोकांसारखा नसतो. आमच्या आहारात मीठ, तेल आणि तिखट अजिबात नसते. त्यामुळे आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकलो.- राम निवास, विजेता शरीरसौष्ठवपटू (छायाः दिलीप कागडा)
  • 5/

    मिश्र जोडी प्रकारामध्ये या वेळी तीन जोडय़ांनी प्रदर्शन केले. यामध्ये जागतिक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्वेताने आपला सहकारी रायनबरोबर ही स्पर्धा एक हाती जिंकली. शरीरसौष्ठव आणि नृत्य यांची योग्य सांगड या जोडीकडून पाहायला मिळाली. (छायाः दिलीप कागडा)

  • 6/

    भारतामध्ये पहिल्यांदाच मिश्र जोडीची स्पर्धा झाली आणि त्यामध्ये आम्ही विजयी ठरलो, याचा फार आनंद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मी ही स्पर्धा पाहिली होती. त्याचा मला फायदा झाला. शरीरसंपदा दाखवताना त्याला नृत्याची सांगड घालायची असते. या नृत्याची संरचना मी केली होती. या विजयामुळे आत्मविश्वास उंचावला आहे.- श्वेता राठोर, मिश्र दुहेरीतील विजेती (छायाः दिलीप कागडा)

  • 7/

    ‘तळवलकर क्लासिक’ स्पर्धेतील मिश्र जोडी विभागात ममता आणि तिचे पती बोरून यमनम यांनी सहभाग घेतला होता. भारतामध्ये एखाद्या शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरणारे हे पहिलेच दाम्पत्य ठरले. या दोघांना पाहूनच ही संकल्पना भारतामध्ये प्रत्यक्षात उतरली. हे दोघेही मणिपूरचे असून सध्या ते दिल्लीमध्ये एकत्रित सराव करतात. (छायाः दिलीप कागडा)

  • 8/

    ‘‘आतापर्यंत मी बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळले. भारतात खऱ्या अर्थाने महिला शरीरसौष्ठवाची मी सुरुवात केली, पण महिलांना या स्पर्धेसाठी अजूनही चांगला प्रतिसाद मिळत नाही. शरीरसौष्ठवाकडे एका खेळाच्या नजरेतून लोकांनी पाहायला हवे, तरच भारतात महिला शरीरसौष्ठवपटूंची संख्या वाढेल,’’ अशी भावना आंतरराष्ट्रीय महिला शरीरसौष्ठवपटू ममता देवीने व्यक्त केली. (छायाः दिलीप कागडा)

  • 9/

    (छायाः दिलीप कागडा)

  • 10/

    (छायाः दिलीप कागडा)

  • 11/

    (छायाः दिलीप कागडा)

  • 12/

    (छायाः दिलीप कागडा)

Web Title: Talwalkar classic 2015 compeition

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.