• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. kbd junior gets tremendous response in mumbai as young kids met kashiling adke and nitin madne

यू मुम्बाच्या काशिलींग आणि नितीनची लहानग्या कबड्डीपटूंसोबत मस्ती

कबड्डी ज्युनिअर स्पर्धेला मुंबईतही चांगला प्रतिसाद

August 22, 2017 19:07 IST
Follow Us
  • प्रो-कबड्डीने यंदाच्या पर्वात केबीडी ज्यूनियर नावाने नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये ज्या शहरात सामने होणार आहेत. त्या शहरातील लहान मुलांना प्रो-कबड्डीच्या खेळाडूंशी भेटण्याची संधी मिळाली. यू मुम्बाचा नितीन मदने आणि काशिलींग अडके यांनी आज कफ परेड भागातील जी.डी.सोमानी शाळेला भेट दिली.
    1/

    प्रो-कबड्डीने यंदाच्या पर्वात केबीडी ज्यूनियर नावाने नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये ज्या शहरात सामने होणार आहेत. त्या शहरातील लहान मुलांना प्रो-कबड्डीच्या खेळाडूंशी भेटण्याची संधी मिळाली. यू मुम्बाचा नितीन मदने आणि काशिलींग अडके यांनी आज कफ परेड भागातील जी.डी.सोमानी शाळेला भेट दिली.

  • 2/

    यावेळी मुंबईच्या नामांकित ८ शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. काशिलींग आणि नितीन मदनेच्या नेतृत्वाखाली दोन संघांचा सामना खेळवण्यात आला.

  • 3/

    काशिलींग अडके आपल्या संघाला टिप्स देताना. ज्या खेळाडूला आपण आतापर्यंत टिव्हीवर पाहत होतो, त्याला प्रत्यक्षात समोर पाहताना या लहानग्या खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता.

  • 4/

    नितीन मदनेनेही आपल्या संघाला चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. या नवीन खेळाडूंसोबत नितीन आणि काशिलींग मिसळून गेलेले पहायला मिळाले.

  • 5/

    आपल्या संघातील चढाईपटूंना आत्मविश्वास देत काशिलींगच्या देखरेखीखाली सामन्याची सुरुवात झाली.

  • 6/

    दुसऱ्या बाजूने नितीन मदनेही आपल्या संघातल्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेऊन होता.

  • 7/

    काशिलींगच्या संघाचा या सामन्यावर जास्त पगडा दिसून आला.

  • 8/

    नितीन मदनेच्या संघातील खेळाडूंना काशिलींगच्या संघातील खेळाडूंना पुरतं जेरीस आणलं.

  • 9/

    अखेर काशिलींग अडकेचा संघ या सामन्यात विजयी ठरला. कबड्डीकडे नव्या पिढीची ओढ पाहून यावेळी दोन्ही खेळाडूंनी आनंद व्यक्त केला.

TOPICS
प्रो कबड्डी सीझन 5Pro Kabaddi Season 5यु मुंबाU Mumba

Web Title: Kbd junior gets tremendous response in mumbai as young kids met kashiling adke and nitin madne

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.