-
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाला उत्तर देताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ६९ धावांतच संपुष्टात आला. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्या समान्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्ध्याला टक्कर देताना मैदानात तसेच मैदानाबाहेर कॅमेरात काही खास क्षण टिपले गेले. त्याचीच ही फोटोगॅलरी… (छाया सौजन्य: ट्विटर)
-
भारताने या सामन्यातही दमदार कामगिरी करत पाकिस्तानसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले (छाया सौजन्य: ट्विटर)
-
भारताकडून शुभमन गिलने नाबाद १०२ धावांची खेळी केली. शुभमने शेवटच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. (छाया सौजन्य: ट्विटर)
-
शुभमन गिलने ९४ चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावांची खेळी केली. १०८.५ च्या सरासरीने त्याने सात चौकारांच्या मदतीने हे शकत ठोकले. (छाया सौजन्य: ट्विटर)
-
शुभमन गिलने अखेरच्या चेंडूंवर शतक साजरे केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनीही त्याचे अभिनंदन केले. (छाया सौजन्य: ट्विटर)
-
भारताकडून शुभमनबरोबरच मनज्योत कालरा, पृथ्वी शॉ आणि अनुकूल रॉय यांनी चांगली फंलंदाजी केली (छाया सौजन्य: ट्विटर)
-
भारत पाकिस्तान म्हटल्यावर मैदानातील वातावरण तापलेले असल्याचे पहायला मिळते. मात्र या सामन्यामध्ये अनेकदा स्पोर्ट्समनशीप पहायला मिळाली. मग अगदी शुभमनचे अभिनंदन करण्यापासून ते प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या बुटांचे लेस बांधण्यापर्यंत अनेक क्षण कॅमेराच्या नजरेतून सुटले नाही. (छाया सौजन्य: ट्विटर)
-
पाकिस्तानसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवल्यावर भारतीय संघ योग्य प्लॅनिंग करतच मैदानात उतरला (छाया सौजन्य: ट्विटर)
-
भारताने फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच क्षेत्ररक्षणातीही अव्वल दर्जाची कामगिरी केली. भारतीय खेळांडूंमधील उत्साह मैदानात प्रत्येक क्षणी दिसून येत होता. गोलंदाजांना खेळाडूंनी चांगली साथ दिली. (छाया सौजन्य: ट्विटर)
-
ऑन फिल्डबरोबरच ऑफ फिल्डही अनेक घडामोडी दिसून आल्या. भारत पाकिस्तान सामना कोणत्याही देशात आणि कोणत्याही खेळाचा असला तरी दोन्ही देशांचे चाहते या सामन्यांना गर्दी करतातच. आता हा फोटो त्याचेच एक उदाहरण (छाया सौजन्य: ट्विटर)
-
फलंदाजीला साथ देत भारताची गोलंदाजी हे पुन्हा एकदा जमेची बाजू ठरली आणि पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला अवघ्या ६९ धावांवर भारतीय गोलंदाजांनी तंबूत धाडले. इशान पोरेलने १७ धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानचे चार गडी बाद केले. त्याचप्रमाणे शिवा सिंग आणि रायन पराग यांनी प्रत्येकी दोन तर अनुकूल रॉय आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी एक गडी बाद केला. (छाया सौजन्य: ट्विटर)
-
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून गोलंदाजी केली. २७३ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या केवळ तीन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. (छाया सौजन्य: ट्विटर)
-
सामना जिंकल्यानंतर सेल्फी तो बनता है… (छाया सौजन्य: ट्विटर)
-
असा आला सेल्फी… (छाया सौजन्य: ट्विटर)
-
भारतीय संघाच्या या कामगिरीसाठी राहुल द्रविडचे सर्वच स्तरातून कौतूक होताना दिसत आहे. राहुलच्या शिकवणीत तयार झालेल्या या भारतीय संघाने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली असून अनेक सामन्यांमध्ये एकहाती विजय मिळवला आहे. सामना संपल्यानंतर मैदानात जाताना अनेक प्रेक्षकांनी सर द्रविड यांनाही सेल्फीसाठी घेरले. आणि स्वभावाप्रमाणे द्रविड सरांनीही सेल्फीला नकार दिला आहे. (छाया सौजन्य: ट्विटर)
-
या विजयानंतर भारत आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल तो विश्वविजेता होण्यासाठीच. ३ फ्रेब्रुवारी रोजी १९ वर्षाखालील विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. (छाया सौजन्य: ट्विटर)
PHOTO: भारत-पाकिस्तान सामन्यातील खास क्षण
भारत पाकिस्तान सामन्यातील खास क्षणचित्रे
Web Title: Photo india beats pakistan in under 19 cricket world cup semi final to enter final against australia