• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. 3 batsman who manage to smash half century in just 12 balls in t20 cricket psd

दोन षटकांत अर्धशतक, टी-२० क्रिकेटमध्ये फक्त ३ फलंदाजांनाच जमलाय हा विक्रम

लावा बरं अंदाज कोण असतील हे खेळाडू??

August 15, 2020 15:36 IST
Follow Us
  • क्रिकेटचा सामना म्हटलं की फलंदाजाला मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करताना पाहणं सर्वांना आवडतं.
    1/

    क्रिकेटचा सामना म्हटलं की फलंदाजाला मैदानात चौकार-षटकारांची आतिषबाजी करताना पाहणं सर्वांना आवडतं.

  • 2/

    टी-२० क्रिकेटच्या आगमनानंतर तर प्रत्येक फलंदाज मैदानात फटकेबाजी करत उपस्थित प्रेक्षकांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतो.

  • 3/

    सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांची फटकेबाजी पाहून समोरचा गोलंदाजही बुचकळ्यात पडतो.

  • 4/

    आज आपण टी-२० क्रिकेटमध्ये २ षटकांत अर्धशतक झळकावण्याची किमया साधणाऱ्या ३ फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.

  • 5/

    १) युवराज सिंह – २००७ टी-२० विश्वचषक, इंग्लंडविरुद्ध सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडची धुलाई करताना युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. या सामन्यात युवराजने १२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. १६ चेंडूत ५८ धावा करणाऱ्या युवराजने या सामन्यात ७ षटकार लगावले होते. (फोटो सौजन्य – रॉयटर्स)

  • 6/

    २) ख्रिस गेल – बिग बॅश लिग स्पर्धेत खेळत असताना ख्रिस गेलने मेलबर्न संघाकडून आक्रमक फटकेबाजी केली होती. अ‍ॅडिलेड स्ट्राईकर्स विरुद्ध सामन्यात गेलने १२ चेंडूत अर्धशतक झळकावलं. ७ षटकार आणि २ चौकारांच्या सहाय्याने गेलने या सामन्यात १७ चेंडूत ५६ धावा केल्या होत्या.

  • 7/

    ३) हजरतउल्ला झजाई – अफगाणिस्तान प्रिमीअर लिग स्पर्धेत खेळत असताना हजरउल्लानेही ६ चेंडूत ६ षटकार ठोकण्याची किमया साधली होती. या सामन्यात हजरउल्लाने १२ चेंडूत अर्धशतक साजरं केलं. काबुल ज्वानन संघाकडून हजरउल्ला खेळत असताना बल्ख लिजंड्स संघाविरुद्ध १७ चेंडूत ६२ धावा पटकावल्या होत्या. (फोटो सौजन्य – Afghanistan Premier League Twitter)

Web Title: 3 batsman who manage to smash half century in just 12 balls in t20 cricket psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.