-
मुंबई इंडियन्सचा खेळाडू कृणाल पांड्या याला मुंबई विमानतळार रोखत चौकशी करण्यात आली आहे. (All Photos: Krunal Pandya Instagram)
-
मुंबई इंडियन्स संघ आयपीएलचा अंतिम सामना जिंकून दुबईहून परतत असताना कृणाल पांड्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोखण्यात आलं.
-
जवळपास तीन तास कृणाल पांड्याची चौकशी करण्यात आली.
-
कृणाल पांड्याने हिरेजडीत तसंच इतर मौल्यवान घड्याळं कोणतीही माहिती न देता आणल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
-
सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे २९ वर्षीय कृणाल पांड्याला विमानतळार रोखण्यात आलं. यावेळी त्याच्याकडे Audemars Piguet ची दोन हिरेजडीत तसंच Rolex ची दोन घड्याळं कस्टमला कोणतीही माहिती न देता बाळगल्याचं समोर आलं.
-
या घड्याळांची एकूण किंमत १ कोटी आहे.
-
मुंबई इंडियन्सचा संघ ४.३० वाजता चार्टर्ड विमानाने मुंबई विमानतळावर पोहोचला होता. यावेळी कृणाल पांड्याची जवळपास तीन तास चौकशी करण्यात आली.
-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घड्याळं जप्त केल्यानंतर कृणाल पांड्याला जाण्याची परवानगी देण्यात आली.
-
घड्याळं मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाकडे सोपवण्यात आली आहेत. जर ती घड्याळं हवी असतील तर कृणाल पांड्याला शुल्क आणि दंड भरावा लागेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
कृणाल पांड्या हा भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा भाऊ आहे. कृणाल पांड्याने भारतासाठी १८ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
-
करोनामुळे यावेळच्या आयपीएल स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम सामना जिंकत पाचव्यांदा चॅम्पिअन ठरली आहे. कृणाल पांड्यादेखील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. आयपीएल जिंकून मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी दुबईहून भारतात परतला.
…म्हणून कृणाल पांड्याची मुंबई विमानतळावर तीन तास चौकशी करण्यात आली
जवळपास तीन तास कृणाल पांड्याची चौकशी करण्यात आली
Web Title: Krunal pandya questioned at mumbai airport over luxury watches sgy