• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs aus during day 1 of boxing day test dean jones was remembered scsg

IND vs AUS : दुसऱ्या कसोटीमध्ये Tea Break दरम्यान मैदानात आलेल्या ‘त्या’ तिघी कोण?

सोशल मीडियावर सध्या त्यांचे फोटो होत आहेत व्हायरल

Updated: September 9, 2021 00:40 IST
Follow Us
  • भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 'बॉक्सिंग डे' कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचे दिवंगत क्रिकेटपटू डीन जोन्स यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
    1/20

    भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 'बॉक्सिंग डे' कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचे दिवंगत क्रिकेटपटू डीन जोन्स यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

  • 2/20

    ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक म्हणून नावारुपास आलेल्या डीन जोन्स यांचं याच वर्षी २४ सप्टेंबर रोजी निधन झालं. डीन जोन्स यांच्या होम ग्राउण्डवर म्हणजेच मेलर्बर्न क्रिकेट ग्राऊण्डवर त्यांना विशेष श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांची पत्नी, दोन्ही मुली आणि ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डरही उपस्थित होते.

  • 3/20

    दुसऱ्या कसोटीदरम्यान चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला त्यावेळी डीन जोन्स यांना क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

  • 4/20

    डीन यांची पत्नी जेन, मुली ऑगस्टा आणि फोबे या तिघीही उपस्थित होत्या.

  • 5/20

    जेन, ऑगस्टा आणि फोबे या तिघींनीही डीन यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मैदानाला एक छोटी फेरी मारुन डीन यांच्या चाहत्यांचं आभिवादन स्वीकारलं.

  • 6/20

    डीनची बॅगी ग्रीन कॅप, सनग्लासेस आणि कूकाबुरा बॅट अशा वस्तू यावेळी मैदानाच्या मध्यभागी असणाऱ्या स्टम्पजवळ या तिघींनी ठेवल्या.

  • 7/20

    डीन जोन्स यांचे अनेक चाहतेही यावेळी त्यांचे पोस्टर्स घेऊन मैदानात उपस्थित असल्याचं पहायला मिळालं.

  • 8/20

    मैदानामध्ये उपस्थित असणाऱ्या तीस हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या लाडक्या खेळाडूला अखेरचा सलाम केला.

  • 9/20

    डीन जोन्स यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईमध्ये ४ सप्टेंबर रोजी निधन झालं.

  • 10/20

    डीन यांच्या मुलीने स्टॅम्पवर त्यांची टोपी ठेवल्यानंतर त्या टोपीचे प्रेमाने चुंबन घेतलं.

  • 11/20

    डीन यांचे कुटुंबीय यावेळी भावूक झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

  • 12/20

    तिघीही अगदी प्रेमाने स्टम्पवरील ही टोपी ठेऊन आपल्या भावना व्यक्त करताना दिसल्या.

  • 13/20

    उपस्थित क्रिकेट चाहत्यांनाही जोरदार आवाज करुन, टाळ्या वाजवून या तिघींना धीर देत आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगण्याचा प्रयत्न केला.

  • 14/20

    यावेळी मैदानातील मोठ्या स्कोअरबोर्ड दाखवणाऱ्या स्क्रीनवर डीन यांचा फोटो झळत होता.

  • 15/20

    यापूर्वीही डीन यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिक ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर ते थेट मैदानात नेण्याची परवानगी देत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली होती.

  • 16/20

    आयपीएलदरम्यान समालोचन करण्यासाठी डीन जोन्स मुंबईमध्ये होते त्याचवेळी त्याचं निधन झालं.

  • 17/20

    कसोटी क्रिकेटमध्ये आपले महत्त्व सिद्ध करूनही ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक डीन जोन्स एकदिवसीय प्रकारातील फलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षणासाठी विशेष ओळखले जात. ‘आयसीसी’ क्रिकेट क्रमवारीअगोदर म्हणजे १९९०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत ते जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजांपैकी एक मानले जात होते. 

  • 18/20

    या आगळ्या वेगळ्या श्रद्धांजलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

  • 19/20

    या श्रद्धांजलीनंतर दोन्ही टीमचे बारावे खेळाडू म्हणजेच भारताचा के. एल. राहुल आणि ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पेटिंसन यांनी या वस्तू उचलून बॉण्ड्रीजवळच्या एका सीटवर ठेवल्या. 

  • 20/20

    ऑस्ट्रेलियन संघानेही डीन यांच्या खास शैलीमध्ये मानवंदना दिली. ज्याप्रमाणे डीन आपल्या ओठांच्या सुरक्षेसाठी पांढऱ्या रंगाची झिंक क्रीम लावायेच तशीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लावली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने #ZincUpForDeano या हॅशटॅगसहीत प्रेक्षकांनाही असं करुन फोटो पोस्ट करण्यास सांगितलं होतं. (फोटो : एपी आणि ट्विटरवरुन साभार)

Web Title: Ind vs aus during day 1 of boxing day test dean jones was remembered scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.