-
विराट कोहली मायदेशी परतल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी अंगावर आलेल्या अजिंक्य रहाणेने आज मेलबर्नच्या मैदानावर कॅप्टन इनिंग सादर केली. (सर्व फोटो सौजन्य – अजिंक्य रहाणे इन्स्टाग्राम)
-
अजिंक्यच्या जिगरबाज शतकाच्या बळावर दुसऱ्या दिवशी भारताला ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी मिळवता आली. अजिंक्य १०४ धावांवर नाबाद आहे.
-
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे रणजी स्पर्धेत मुंबईकडून खेळतो.
-
२००७ साली कराची येथे मोहम्मद निस्सार ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्य रहाणेने वयाच्या १९ व्या वर्षी कराची अर्बन संघाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्याच सामन्यात त्याने शतक ठोकले.
-
आयपीएल २०१८ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने चार कोटी रुपयांची बोली लावून अजिंक्य रहाणेला आपल्या संघात घेतले.
-
अजिंक्यला आधी राजस्थान रॉयल्सचे उपकर्णधार बनवण्यात आले होते. पण २०१८ साली स्टीव्ह स्मिथवर बॉल टॅम्परिंग प्रकरणात बंदी आल्यानंतर कर्णधारपद रहाणेकडे आले.
-
अजिंक्य रहाणे कसोटी पदार्पणाच्या संधीच्या प्रतिक्षेत होता. अखेर २०१३ साली त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केले.
-
अजिंक्य रहाणेने आतापर्यंत ६६ कसोटी सामन्यात ४२.८८ च्या सरासरीने ४,२४५ धावा केल्या आहेत. अजिंक्यने इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शतके झळकवली आहेत. २०१३ साली डरबनमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध शतक झळकवण्याची संधी थोडक्यात हुकली.
-
अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका धोपवकर बरोबर शाळेत असताना ओळख झाली. प्रेमात पडण्याआधी दोघे परस्परांचे चांगले मित्र होते.
-
२६ सप्टेंबर २०१४ रोजी अजिंक्य प्रेयसी राधिका धोपवकरबरोबर विवाहबंधनात अडकला.
-
सप्टेंबर २०१९ मध्ये अजिंक्यने पत्नीसोबतचा फोटो शेअर करुन तो 'बाबा' बनणार असल्याची माहिती दिली.
-
ऑक्टोंबर २०१९ मध्ये अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्रामवर पत्नी राधिका आणि आपल्या बाळासोबतचा फोटो शेअर केला.
-
लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाला अजिंक्यने पत्नी राधिकासोबतचा सेल्फी शेअर करुन 'जस्ट मॅरिड…पाच वर्षांपूर्वी' असे कॅप्शन दिले होते.
-
भारतीय क्रिकेट संघाच्या परदेश दौऱ्याच्यावेळी पत्नी राधिकाही अजिंक्यसोबत असायची. प्रेक्षक गॅलरीतून ती अजिंक्यला चिअर करायची.
-
फार कमी जणांना माहित असेल अजिंक्यला भारताचे माजी क्रिकेटपटू प्रविण आमरे यांनी प्रशिक्षण दिले आहे.
कॅप्टन इनिंग खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेची रोमँटिक बाजू तुम्हाला माहित आहे ?
Web Title: Captain inning played by ajinkya rahane against australia at melbourne know about his romantic side with wife radhika dmp