-
गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांकडून महिलांना अनेक गोष्टींची खबरदारी घेण्याबद्दल सल्ला दिला जातो. वजन उचलण्यापासून ते चालण्यापर्यंत. या काळात महिलाही या गोष्टींचं दडपण घेताना दिसतात. पण, पाचवा महिना सुरू असतानाही अंकिता गौर या धावपटूनं दहा किमी मॅरेथॉन पूर्ण करून दाखवली. (फोटो_अंकिता गौर/इन्स्टाग्राम)
-
पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या अंकिताने नुकतीच १० किमी मॅरेथॉन जिंकली आहे. १० किमी अंतर अंकिताने एक तास दोन मिनिटात पूर्ण केलं.
-
६२ मिनिटांच्या वेळात अंकिताने ६ मिनिटं पाणी पिण्यासाठी आणि शौचालयासाठी ब्रेक घेतला होता.
-
ब्रेक घेतल्यानंतर अंकिता १२ व्या मजले चढून गेली आणि उतरलीही. अंकिताने केलेल्या या कामगिरीचं कौतूक होतं आहे.
-
मागील नऊ वर्षांपासून अंकिता नियमितपणे धावते.
-
दररोज धावायला जाणं हे माझ्यासाठी श्वास घेण्यासारखं असल्याचं अंकिता सांगते.
-
मागील नऊ वर्षांपासून मी हे करते. कधी कधी जखमीही होते. पण, धावणं सुरूच ठेवलं आहे, असं अंकिता सांगते.
-
इंजिनिअर असलेली अंकिता टीसीएस वर्ल्डच्या १० किमी मॅरेथॉन स्पर्धेत २०१३ पासून सहभागी होत आहे.
-
अंकिता आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी झालेली आहे. यात बर्लिनमधील तीन, बोस्टन आणि न्यूयॉर्कमधील मॅरेथॉन स्पर्धेत ती सहभागी झाली होती.
-
अंकिताने गर्भवती असताना मावळत्या वर्षात टीसीएस वर्ल्डच्या १० किमी बंगळुरू स्पर्धेत सहभाग घेतला होता. पोस्ट लिहून याची माहिती दिली होती.
पाच महिन्यांची गर्भवती असताना पूर्ण केली १० किमीची मॅरेथॉन; जाणून घ्या होणाऱ्या आईच्या जिद्दीची कहाणी
Web Title: Five month pregnant mom ankita gaur finishes 10 kilometer race in 62 minutes bmh