-
बडोदा क्रिकेट टीमचा कर्णधार कृणाल पांड्याविरोधात तक्रार करणारा क्रिकेटपटू दीपक हुड्डा आता स्वतःच अडचणीत सापडलाय.
-
बडोदा क्रिकेट असोसिएशनने हुड्डाविरोधात आवश्यक कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
-
पांड्याने शिवीगाळ केल्याची आणि करीअर संपवण्याची धमकी दिली अशी तक्रार करत हुड्डाने शनिवारी अखेरच्या क्षणी मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेतून माघार घेतली.
-
पण, हुड्डाने उचललेलं पाऊल गैरवर्तन असल्याचं बडोदा क्रिकेट असोसिएशनचे(बीसीए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शिशिर हट्टंगडी यांनी म्हटलं आहे. espncricinfo ने याबाबतचं वृत्त दिलंय.
-
हुड्डाने उचललेलं पाऊल गैरवर्तन असून याबाबत बीसीसीआय आणि हुड्डा ज्या आयपीएल संघासाठी खेळतो त्या दोघांनाही सूचना दिली जाईल असं शिशिर हट्टंगडी यांनी सांगितलं.
-
पुढे बोलताना, 'संघ व्यवस्थापन आणि बीसीएसोबत चर्चा करुन समस्या सोडवता आली असती, पण त्याने माध्यमांसमोर घटनेचा खुलासा केला. माध्यमांसमोर हुड्डाने केवळ स्वतःची बाजू मांडली आणि सहानुभूती मिळवली प्रसिद्धी मिळविण्याचा आणि खेळापेक्षा स्वत:ला जास्त महत्त्व देण्याचा हा प्रयत्न आहे, असं शिशिर हट्टंगडी म्हणाले.
-
तसेच, "मतभेद नाहीत असा एकही संघ नाहीये. पण माध्यमांसमोर केवळ आपली बाजू मांडणं, स्पर्धेतून स्वतःचं नाव मागे घेणं हे योग्य नाहीये…यामुळे बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिमेला धक्का बसला असून आवश्यक कारवाई करू" असं शिशिर हट्टंगडी यांनी सांगितलं.
-
याशिवाय, संघ व्यवस्थापनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही केला होता पण त्यानंतरही हुड्डाने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असंही हट्टंगडी यांनी नमूद केलं.
-
काय आहे प्रकरण? : करोना महामारीनंतर रविवारपासून देशात मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ झाला. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच बडोद्याच्या संघातील एक वाद समोर आला आणि बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार करत अखेरच्या क्षणी दीपक हुड्डानं स्पर्धेतून माघार घेतली.
-
सराव करत असताना पांड्या आणि हुड्डामध्ये वाद झाला. त्यानंतर पांड्याने शिवीगाळ केली आणि कारकिर्द संपवण्याची धमकी दिली. त्यामुळे मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेत आहे, अशी तक्रार दीपक हुड्डाने बीसीसीआयकडे ईमेलद्वारे केली होती.
दीपक हुड्डावरच होणार कारवाई, कृणाल पांड्याने शिवीगाळ केल्याची केली होती तक्रार
दीपक हुड्डा आता स्वतःच अडचणीत…
Web Title: Deepak hooda leaves camp alleging misbehaviour by krunal pandya baroda to take action against deepak hooda for outburst sas