-
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचे शनिवारी सकाळी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. त्यामुळे पांड्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसाळला.
-
वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्यानी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
-
वडिलांसोबत फोटो पोस्ट करत हार्दिकनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
आपल्या पोस्टमध्ये हार्दिक म्हणाला की, 'माझे वडील, माझे हिरो…तुम्हाला आम्ही गमावलं. ही गो्ष्ट आम्ही आयुष्यात कधीही स्वीकारू शकत नाही. पण तुम्ही आमच्यासाठी गोड आठवणी ठेवून गेलात. आज तुमची मुलं जे काही मिळवू शकली आहेत, ते फक्त तुमच्यामुळे.'
-
तुम्हाला गर्व होता, पण आम्हाला सर्वांना गर्व आहे की तुम्ही तुमचं जीवन आनंतात घालवलं. तुमची नेहमी आठवण येईल.
-
आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि यापुढेही करत राहू. तुमचे नाव नेहमी टॉपवर राहील.
-
मला एक गोष्ट माहीत आहे, तुम्ही आम्हाला वरुन त्याचप्रकारे बघत आहात. ज्याप्रकारे तुम्ही इथे केले होते
-
अशाप्रकारे हार्दिकने वडिलांचं निधन झाल्यानंतर आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
-
हार्दिक आणि क्रुणाल या दोघांनी कायमच आपल्या यशाचं श्रेय हे वडिलांना दिलं आहे. दोघांच्या यशस्वी क्रिकेट खेळण्यामागे त्यांच्या वडिलांची मेहनत आहे.
-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारताचे माजी गोलंदाज इरफान पठानने हार्दिक आणि क्रुणाल पांड्याच्या वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
-
वडिलांचे निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर क्रृणाल पांड्यानं एका क्षणाचाही विलंब न करता बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला . यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही.
‘सर्व काही फक्त तुमच्यामुळेच’, वडिलांच्या निधनानंतर हार्दिक पांड्याची भावूक पोस्ट
Web Title: Rest in peace my king i will miss you every day hardik pandya pays tribute to father nck