Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india vs australia brisbane test secret of shubman gills success dmp

….म्हणून ऑस्ट्रेलियात शुबमन ठरला यशस्वी, ‘हे’ आहे त्याच्या यशाचे ‘सिक्रेट’

Updated: September 9, 2021 00:37 IST
Follow Us
  • नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय मिळवलाच. पण त्याच बरोबर भविष्याच्या दृष्टीने या मालिकेतून भारताला अनेक उदयोन्मुख प्रतिभावंत खेळाडूही गवसले. (फोटो सौजन्य - शुबमन गिल इन्स्टाग्राम)
    1/15

    नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय मिळवलाच. पण त्याच बरोबर भविष्याच्या दृष्टीने या मालिकेतून भारताला अनेक उदयोन्मुख प्रतिभावंत खेळाडूही गवसले. (फोटो सौजन्य – शुबमन गिल इन्स्टाग्राम)

  • 2/15

    या खेळाडूंपैकीच एक आहे शुबमन गिल. ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स दोघेही टिच्चून मारा करत होते. ताशी १५० किमी वेगाने दोघे गोलंदाजी करत होते.

  • 3/15

    ऑस्ट्रेलियाच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर इतक्या वेगवान गोलंदाजी माऱ्याचा सामना करणे सोपे नाही. शुबमन गिल आणि चेतेश्वर पूजाराला शॉर्ट पीच चेंडूंवर अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

  • 4/15

    पूजाराला एकदा, दोनदा नव्हे, तर तब्बल ११ वेळा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे उसळते चेंडू लागले. कमिन्सचा बाऊन्सर आधी हेल्मेटवर आदळला. त्यानंतर दुसरा बाऊन्सर हेल्मेटच्या कडेला लागला. पण हा मार सहन करुनही, पूजारा खेळपट्टीवर एका योद्धयासारखा पाय रोवून उभा राहिला.

  • 5/15

    दुसऱ्या बाजूला शुबमन गिल सहजतेने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांच्या शॉर्टपीच चेंडूचा सामना करत होता. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तर त्याने सुरेख फटकेबाजी केली. स्टार्कच्या एका षटकात त्याने २० धावा वसूल केल्या. पुल, हूक, कट या फटक्यांचा त्याने खुबीने वापर केला. (Twitter/BCCI)

  • 6/15

    खरंतर शुबमन ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते पाहून त्याने दुसऱ्याच मेलबर्न कसोटीत पदार्पण केलेय, असे वाटत नव्हते. शुबमन गिलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहून तो भारतीय संघातील नवखा खेळाडू आहे असे अजिबात वाटले नाही.

  • 7/15

    शुबमन गिलने आज हे यश कशामुळे मिळवले? त्याच्या यशाचं नक्की सिक्रेट काय आहे? ते समजून घेऊया.

  • 8/15

    शुबमन गिलचे वडिल लखविंदर गिल हे प्रोफेशनल क्रिकेटपटू नाहीत. तरुणपणी लखविंदर यांना पंजाबसाठी क्रिकेट खेळायचे होते. पण त्यावेळी काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही.

  • 9/15

    पण आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचा ध्यास त्यांनी सोडला नाही. तेच शुबमनचे पहिले कोच आहेत.

  • 10/15

    शुबमनला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. क्रिकेटबद्दलची त्याची आवड पाहून लखविंदर यांनीच त्याला क्रिकेटचे धडे देण्याचा निर्णय घेतला. लखविंदर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली.

  • 11/15

    लखविंदर गिल हे मूळचे चाक खेरे वाला गावातील. पंजाबच्या फाझिल्का जिल्ह्यात हे गाव येते. मोहालीपासून हे गाव ३०० किमी अंतरावर आहे. (Express photo: Jasbir Malhi)

  • 12/15

    गावी क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक सुविधा नव्हत्या. मुलाचे क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी मोहालीला येण्याचा धाडसी निर्णय घेतला.

  • 13/15

    मोहालीतील क्रिकेट अ‍ॅकेडमीत शुबमनचे नाव नोंदवण्यात आले. क्रिकेट अकादमीत मुलाचे नाव नोंदवून लखविंदर थांबले नाहीत. त्यांचे शुबमनच्या प्रगतीवर बारीक लक्ष होते.

  • 14/15

    वेगवान गोलंदाजी खासकरुन शॉर्ट पीच चेंडूवर शुबमनचा खेळ उंचावण्यासाठी त्यांनी प्रशिक्षणाच्या वेगवेगळया पद्धती अवलंबल्या. शुबमन नऊ वर्षाचा असल्यापासून मी त्याला दिवसाला १५०० शॉर्ट चेंडू खेळायला लावायचो असे लखविंदर यांनी सांगितले.

  • 15/15

    त्याशिवाय मॅटच्या पीचवर त्याच्याकडून फलंदाजीचा सराव करुन घ्यायचो. मॅटवर उसळी घेणाऱ्या चेंडूंचा सामना करणे एक आव्हान असते. मॅटच्या पीचवर खेळणाऱ्यांचा बॅकफूटवरचा खेळ सुधारतो. मोठया लेव्हलच्या क्रिकेटसाठी हे आवश्यक असल्याचे लखविंदर सांगतात. अशा पद्धतीच्या सरावामुळे शुबमन आज ऑस्ट्रेलियामध्ये यशस्वी ठरला.

Web Title: India vs australia brisbane test secret of shubman gills success dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.