-
भारत आणि ऑस्ट्रेलिया सिडनीमध्ये तिसरा कसोटी सामना खेळत असताना चौथ्या कसोटीचे स्थान अनिश्चित होते. (फोटो सौजन्य – एपी)
-
क्वीन्सलँड सरकारच्या कठोर क्वारंटाइन नियमांवर भारतीय संघ व्यवस्थापन वैतागले होते. चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनलाही जाऊ नये, इथपर्यंत विचार सुरु होता.
-
क्वीन्सलँड सरकारने कठोर क्वारंटाइनचे नियम थोडे शिथिल केल्यानंतर ही कोंडी फुटली. (फोटो सौजन्य – पीटीआय)
-
ब्रिस्बेन कसोटीआधी कठोर क्वारंटाइन नियमांना भारतीय संघाचा इतका विरोध का होता? ते फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने स्पष्ट केले. (फोटो सौजन्य – एपी)
-
गाबामध्ये भारतीय खेळाडूंना कठोर क्वारंटाइन नियमांचे पालन करावे लागणार होते, त्याचवेळी क्वीन्सलँड सरकारने ब्रिस्बेनचा कसोटी सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थित राहण्याची अनुमती दिली होती. त्यामुळे भारताने क्वारंटाइन नियमांविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे अश्विनने सांगितले. (फोटो सौजन्य – एपी)
-
"ब्रिस्बेनमध्ये १५ हजार प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित राहण्याची परवानगी होती. जसे काही आम्ही सर्कसचे जोकर आहोत, प्राणी संग्रहालयातील बंद पिजऱ्यातील प्राणी असल्यासारखी आमची भावना होती" असे अश्विनने भारताचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले. (फोटो सौजन्य – एपी)
-
अश्विनने या मुलाखतीत ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन बरोबर झालेला शाब्दिक वादाचा किस्साही सांगितला.
-
“आम्ही आता चौथ्या कसोटीसाठी खूपच आतूर आहोत. तुझा हा शेवटचा दौरा असेल ना”, असा खोचक सवाल टीम पेनने केला. त्यावर अश्विननेही भन्नाट उत्तर दिलं. (फोटो सौजन्य – पीटीआय)
-
“तू भारतात ये… मी पण तुला भारतात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. ती तुझी शेवटची मालिका असेल”, असं उत्तर देत त्याने पेनची बोलती बंद केली. (फोटो सौजन्य – पीटीआय)
-
भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची ही कसोटी मालिका २-१ ने जिंकली. (फोटो सौजन्य – एपी)
‘जसे काही आम्ही सर्कसीतले जोकर’…भारतीय संघ का खवळला? अश्विनने सांगितलं कारण…
Web Title: Before brisbane test what irked indian cricketers ashwin explained dmp