-
आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नर हा हैदराबाद संघाचे नेतृत्व करतो. त्याची स्फोटक सलामी हैदराबादच्या विजयाचा मार्ग ठरू शकते.
-
अफगाणिस्तान फिरकीपटू राशिद खान हैदराबाद संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याची चार षटके केकेआरसाठी घातक ठरू शकतात.
-
मागील वर्षी रसेलची बॅट शांत होती. मात्र, यावर्षी तो पुन्हा चांगल्या फॉर्मात परतण्यासाठी उत्सुक आहे.
-
भारताविरुद्धच्या मालिकेत जॉनी बेअऱस्टोने दमदार कामगिरी केली. हाच फॉर्म आजच्या सामन्यात तो कायम राखतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
-
मागील वर्षी आयपीएलमधून वरुण चक्रवर्ती सर्वांच्या नजरेत आला. भारतीय संघासाठी त्याची निवड झाली, मात्र, खेळण्याची संधी मिळाली नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून आगामी वर्ल्डकपमध्ये आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी तो प्रयत्नशील असेल.
SRH vs KKR : आजच्या सामन्यात ‘हे’ पाच खेळाडू ठरू शकतात एक्स-फॅक्टर!
चेन्नईत रंगणार हैदराबाद वि. कोलकाता सामना
Web Title: Srh vs kkr these five players can be the x factors of todays match adn