Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. in pics ipl 2021 coronavirus positive players ground staff and broadcast team full list scsg

IPL 2021 Coronavirus Positive Players : पाहा नक्की कोणाकोणाला झालीय करोनाची बाधा

आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय तो या वाढत्या करोनाबाधित खेळाडूंच्या संख्येमुळेच

May 4, 2021 16:57 IST
Follow Us
  • देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान, चेन्नईच्या संघातील तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर 'आयपीएल' स्पर्धा स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र मागील दोन दिवसांमध्ये नक्की कोणकोणते खेळाडू बायो-बबलमध्ये राहूनही करोना पॉझिटिव्ह आलेत पाहूयात... (सर्व फोटो ट्विटर, आयएएनएसवरुन साभार)
    1/16

    देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान, चेन्नईच्या संघातील तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर 'आयपीएल' स्पर्धा स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र मागील दोन दिवसांमध्ये नक्की कोणकोणते खेळाडू बायो-बबलमध्ये राहूनही करोना पॉझिटिव्ह आलेत पाहूयात… (सर्व फोटो ट्विटर, आयएएनएसवरुन साभार)

  • 2/16

    वरुण चक्रवर्ती : सोमवारी कोलकाता संघातील वरुण चक्रवर्तीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे ३ मे रोजी आयोजित करण्यात आलेला केकेआर आणि आरसीबी सामना पुढे ढकलण्यात आला.

  • 3/16

    संदीप वॉरीयर : वरुणचाच सहकारी असणाऱ्या संदीप वॉरीयरलाही करोनाची लागण झाली. या दोघांच्याही करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्याने टीमला हार्ट व्हारंटाइनमध्ये ठेवण्यात आल्याचं संघ व्यवस्थापनानं स्पष्ट केलं.

  • 4/16

    New Delhi: Delhअमित मिश्रा : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळणारा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यालाही करोनाची लागण झाली आहे.i Capitals' Amit Mishra celebrates fall of Rohit Sharma's wicket during the 34th match of IPL 2019 between Delhi Capitals and Mumbai Indians at Feroz Shah Kotla in New Delhi on April 18, 2019. (Photo: Surjeet Yadav/IANS)

  • 5/16

    वृद्धिमान साहा : मंगळवारी म्हणजेच ४ मे रोजी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि मुंबईविरुद्ध हैदराबाद सामना स्थगित करण्यासंदर्भातील चर्चा सुरु झाली. मात्र बीसीसीआयने संपूर्ण मालिकाच स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

  • 6/16

    लक्ष्मीपती बालाजी : चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) संघातही करोनाने सोमवारी म्हणजेच ३ मे रोजी ‘एन्ट्री’ घेतली. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांच्यासहीत मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ आणि संघाच्या बसच्या क्लीनरला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

  • 7/16

    अक्षर पटेल : दिल्लीचा अक्षर पटेल स्पर्धा सुरु होण्याआधीच करोना पॉझिटिव्ह आढळल्याने पहिल्या काही सामन्यांना तो मुकला होता.

  • 8/16

    किरण मोरे : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे यष्टीरक्षण प्रशिक्षक किरण मोरे यांना करोनाची लागण झाली आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करत ही माहिती दिली. मोरे यांना मालिका सुरु होण्याआधी करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर मात मिळवली.

  • 9/16

    एनरिक नॉर्किया : दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाला एप्रिलच्या मध्यात करोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर त्याने करोनावर मात केली आणि तो संघामध्ये परतला.

  • 10/16

    डॅनियल सॅम्स : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून खेळणाऱ्या डॅनियल सॅम्सनेही करोनावर मात केल्यानंतरच त्याला संघात प्रवेश देण्यात आला. डॅनियलला ३ एप्रिल रोजी करोनाची लागण झाली होती. १७ एप्रिल रोजी तो करोनामुक्त झाला.

  • 11/16

    नितीश राणा : कोलकाता संघातून खेळणाऱ्या नितीश राणालाही स्पर्धा सुरु होण्याच्याआधी करोनाचा संसर्ग झाला होता. मात्र त्याने त्यावर मात केली आणि तो मैदानात परतला होता.

  • 12/16

    देवदत्त पडिक्कल : आयपीएलच्या या हंगामामधील काही सामन्यांमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या देवदत्त पडिक्कललाही स्पर्धेच्या आधी करोनाची लागण झाली होती. त्याने करोनावर यशस्वीरित्या मात करुन मालिका सुरु होण्याआधीच संघाच्या प्रॅक्टीस सेशन्सला हजेरी लावल्यास सुरुवात केली.

  • 13/16

    दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) पाच ग्राउंड कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याची माहिती सोमवारी म्हणजेच तीन मे २०२१ रोजी दुपारी पाचच्या सुमारास समोर आली.

  • 14/16

    दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ८ मेपर्यंत आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्याची योजना होती. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादसह चार संघ या सामन्यांसाठी दिल्लीत आहेत.

  • 15/16

    आयपीएलमधील खेळाडूच नाही तर ग्राउण्ड स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीममधील सदस्यांनाही करोनाचा फटका बसलाय.

  • 16/16

    मुंबईतील वानखडे स्टेडियमवरील ग्राउण्ड स्टाफपैकी ११ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. तसेच मुंबईमधून सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या टीममधील १४ जणांना करोनाची लागण झाली होती.

Web Title: In pics ipl 2021 coronavirus positive players ground staff and broadcast team full list scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.