तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. भारतीय संघ २० ते २२ जुलै दरम्यान डरहॅममधील संयुक्त काउंटीविरूद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मैदानावरील सरावाचे फोटो शेअर केले आहेत. -
“चला भावांनो, सुट्ट्या संपल्या काम सुरू'',असे कॅप्शन रोहितने आपल्या फोटोला दिले आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचा २० दिवसांचा ब्रेक संपला आहे. आता टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची तयारी सुरू केली आहे. ऋषभ पंत करोना पॉझिटिव्ह आणि वृद्धिमान साहा आयसोलेशनमध्ये असल्यामुळे केएल राहुल सराव सामन्यात यष्टीरक्षण हाताळू शकेल. भारतीय संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे मोठे खेळाडू आपल्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये नाही. अशा परिस्थितीत, डरहॅममध्ये होणाऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यात त्यांच्यावर नजर असेल. २०१८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाचा इंग्लंडच्या भूमीवर १-४ असा पराभव झाला होता.
IND vs ENG : “चला भावांनो, सुट्ट्या संपल्या”, मैदानावर परतले टीम इंडियाचे खेळाडू
Web Title: Ind vs eng indian players returned to the field adn