-
बॉलिवूड सेलिब्रेटी नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. त्याचप्रमाणे भारतीय टीममधील क्रिकेटपटूंच्या जीवनाचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते.
-
भारतीय टीमच्या अनेक क्रिकेटपटूंची लव्ह स्टोरी ही फार मजेशीर आहे. यातील काहींनी बोटवर तर कोणी क्रिकेटच्या ग्राऊंडवर त्यांच्या पत्नीला प्रेमाची कबुली दिली आहे.
-
हार्दिक पांड्या – टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या हा कायमच चर्चेत असतो. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला बोटवर अगदी रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते.
-
महेंद्रसिंह धोनी – भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल अशी ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी याने व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पत्नी साक्षीला प्रपोज केले होते.
-
रोहित शर्मा – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने क्रिकेटच्या मैदानात पत्नीला प्रपोज केले होते. बोरिवलीच्या स्पोर्ट्स क्लबमध्ये त्याने रितिकाला प्रेमाची कबुली दिली होती.
-
झहीर खान – भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने त्याची गर्लफ्रेंड सागरिकाला आयपीएलच्या 10 व्या सिझनदरम्यान प्रपोज केला होता. यादरम्यानच त्यांनी साखरपुडाही केला होता.
-
हरभजन सिंग – भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफस्पिन गोलंदाज हरभजन सिंग याने एका आयपीएलदरम्यान पत्नीला प्रपोज केला होता. मात्र भज्जीची पत्नी गीता बसरा हिने रिलेशनशिपसाठी नकार दिला होता. त्यानंतर जवळपास आठ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले होते. (सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
बोटीपासून थेट मैदानापर्यंत, प्रेमाची कबुली देण्यासाठी क्रिकेटपटूंनी निवडल्या ‘या’ जागा
Web Title: Beautiful love stories of famous cricketers had proposed girlfriend on different ways nrp