Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. tokyo paralympics games 2020 know first ever indian table tennis player bhavina patel in the race to win gold medal nrp

गरिबीला हरवलं, पोलिओशी झुंजली अन् मेडलही केलं पक्कं..! वाचा पॅरालिम्पियन भाविना पटेलचा प्रवास

August 28, 2021 18:39 IST
Follow Us
  • टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. (फोटो सौजन्य - एएनआय)
    1/25

    टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. (फोटो सौजन्य – एएनआय)

  • 2/25

    या स्पर्धेमध्ये तिने उपांत्य फेरीमध्ये चीनच्या झँग मियाओला पराभूत केले आणि दणक्यात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

  • यामुळे अंतिम फेरीमध्ये पोहचणारी ती पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली आहे.
  • 3/25

    महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भाविनाने सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पॅरिच रँकोव्हिच हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता.

  • 4/25

    ३४ वर्षीय भाविनाने चीनच्या झँग मियाओला ३-२ असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं.

  • 5/25

    ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने भाविनाने उपांत्य सामना जिंकला.

  • 6/25

    आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावता आलेलं नाही. त्यामुळेच भारताची पहिली गोल्डन गर्ल होण्याची संधी भाविनाकडे आहे.

  • 7/25

    २०१६ मध्ये रियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि पॅराऑलिम्पियन दीपा मलिकने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.

  • 8/25

    मात्र भाविनाकडे सुवर्ण कामगिरी करुन इतिहास घडवण्याची चांगली संधी आहे.

  • त्यामुळे टेबल टेनिसमध्ये भाविनाकडून आता सुवर्णपदकाच्या आशा देशाला लागून राहिलेल्या आहेत.
  • 9/25

    टेबल टेनिसच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी भाविना ही पहिली भारतीय महिला ठरली असली तरी तिचा इथपर्यंत प्रवास फार खडतर होता.

  • 10/25

    भाविनाचा जन्म ६ नोव्हेंबर १९८६ रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडगर या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

  • 11/25

    पण भाविना एक वर्षाची तिला पोलिओ झाला. भाविनाचे कुटुंब पाच जणांचे असले तरी त्यात कमवता हात फक्त वडिलांचा होता.

  • 12/25

    त्यामुळे त्यांना मुलीवर उपचार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे तिला अपंगत्व आले.

  • 13/25

    एका बाजूला गरिबी आणि दुसऱ्या बाजूला पोलिओमुळे आलेले अपंगत्व याच्याशी झुंज देत असतानाही भाविनाने कधीही हार मानली नाही.

  • यानंतर तिने छंद आणि मनोरंजन म्हणून टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली.
  • 14/25

    व्हिलचेअरवर बसून टेबल टेनिस खेळत असतेवेळी तिने त्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.

  • 15/25

    यावेळी तिला तिचे प्रशिक्षक तेजलबेन लाखिया आणि लालन दोषी यांनी प्रोत्साहन दिले.

  • 16/25

    त्यानंतर टेबल टेनिसमध्ये मेहनत घेत असतानाच तिने बंगळूरुमध्ये राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेवेळी तिने तिचे पहिले सुवर्णपदक पटकावले.

  • 17/25

    तिने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात जॉर्डनपासून केली, मात्र तिला पहिले पदक जिंकण्यास थोडासा उशीर झाला.

  • 18/25

    भाविनाने २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही सहभाग घेतला होता. पण त्यावेळी तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

  • 19/25

    त्यानंतर २०११ थायलंड ओपनमधील पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत तिने रौप्य पदकाची कमाई केली.

  • 20/25

    तर २०१३ मधील आशियाई विभागीय स्पर्धेत तिने प्रथमच रौप्य पदक जिंकले.

  • 21/25

    २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकसाठीही तिची निवड झाली होती, पण काही कारणामुळे तिला यात सहभागी होता आले नाही.

  • 22/25

    दरम्यान आता टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत इतिहास घडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सर्वांचेच लक्ष तिच्याकडे लागले आहे. (सर्व फोटो सौजन्य – ट्वीटर)

Web Title: Tokyo paralympics games 2020 know first ever indian table tennis player bhavina patel in the race to win gold medal nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.