-
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने दमदार कमबॅक करत १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
-
सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले.
-
शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात सर्वबाद २१० धावा करू शकला.
-
या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
-
या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता.
-
भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत.
त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. -
या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवला होता.
-
भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर उमेश यादवने ३ गडी बाद केले.
-
दरम्यान अंत्यत रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला १५७ धावांनी हरवले आणि ५० वर्षांचा दुष्काळ संपवला.
-
आता कसोटी मालिकेतील पाचवा सामना अनिर्णित किंवा भारताने जिंकल्यास मालिका जिंकणार आहे.
-
तर इंग्लंडपुढे आता फक्त मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे त्यांना पाचवा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.
What A Match…!!! ५० वर्षांनंतर भारताची ‘विराट’ कामगिरी
Web Title: India vs england 4th test india beat england by 157 runs 2 1 lead five match series nrp