• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ayesha mukherjee on divorce with indian cricketer shikhar dhawan sgy

“…तेव्हा मी खूप घाबरले होते,” शिखर धवनच्या पत्नीने सांगितला घटस्फोटाचा अनुभव

September 8, 2021 12:12 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखऱ धवन आणि पत्नी आयशाने घटस्फोट घेतला आहे.
    1/26

    भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शिखऱ धवन आणि पत्नी आयशाने घटस्फोट घेतला आहे.

  • 2/26

    नऊ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

  • 3/26

    शिखऱ धवन आणि आयशाच्या घटस्फोटामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

  • 4/26

    आयशाचं हे दुसरं लग्न होतं. याआधीही तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे तिच्यावर दुसऱ्यांदा घटस्फोट घेण्याची वेळ आली आहे.

  • 5/26

    आयशाने आपल्या नव्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक भावनिक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 6/26

    या पोस्टमध्ये आयशा मुखर्जीने घटस्फोटासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 7/26

    “जोपर्यंत मी दोन वेळा घटस्फोटित झाले नाही तोपर्यंत घटस्फोट हा खूप घाणेरडा शब्द असल्याचं मला वाटत होतं. शब्दांचे इतके शक्तिशाली अर्थ आणि संगती असू शकते हे मजेशीर आहे,” असं ती म्हणते.

  • 8/26

    “मी घटस्फोटित म्हणून याआधी याचा अनुभव घेतला होता. जेव्हा पहिल्यांदा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. त्यावेळी मला मी खूप काही चुकीचं करत असल्याचं वाटत होतं,” असं आयशाने म्हटलं आहे.

  • 9/26

    “मी प्रत्येकाला निराश करत असून स्वार्थी असल्याचंही वाटत होतं,” असं आयशा म्हणते.

  • 10/26

    “मी माझ्या कुटुंबाला, मुलांना आणि काही प्रमाणात देवालाही निराश करत असल्याची भावना जाणवत होती. घटस्फोट हा किती घाणेरडा शब्द होता,” असंही तिने सांगितलं आहे.

  • 11/26

    पोस्टमध्ये पुढे तिने म्हटलं आहे की, “मग आता विचार करा, मला दुसऱ्यांदा यामधून जावं लागत आहे. हे भयानक आहे”.

  • 12/26

    “याआधीही माझा घटस्फोट झाला असून दुसऱ्या वेळी माझं खूप काही पणाला होतं असं वाटत होतं. मला खूप काही सिद्ध करायचं होतं. पण जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हाही भीती वाटली. पहिल्यांदा ज्या भीती, अपयश आणि निराशा या भावना होत्या त्या पुन्हा तशाच आल्या”, असं आयशाने सांगितलं आहे.

  • 13/26

    एकदा सर्व काही प्रक्रिया पार पडली आणि भावनांमधून बाहेर पडले तेव्हा मी शांतपणे बसले आणि आता आपण ठीक आहोत आणि आपण खूप चांगलं करत आहोत असं वाटलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी माझी भीती पूर्णपणे गेली होती असं आयशाने म्हटलं आहे.

  • 14/26

    विशेष म्हणजे मला अजून सबल झाल्यासारखं वाटलं असल्याचंही आयशाने सांगितलं आहे.

  • 15/26

    घटस्फोट शब्दाची भीती आणि त्याचा अर्थ मी स्वत:च तयार केला होता याची जाणीव झाल्याचंही तिने म्हटलं आहे.

  • 16/26

    त्यामुळे जेव्हा मी शब्दाचा नव्याने अर्थ जाणून घेतला त्यानंतर माझ्या पद्धतीने घटस्फोटाकडे पाहत असून त्याचा अनुभव घेत असल्याचं आयशाने सांगितलं आहे.

  • 17/26

    आयशाने यावेळी घटस्फोटाचा अर्थही उलगडला आहे. घटस्फोट म्हणजे आपली निवड करणं असून लग्नासाठी आपलं आयुष्य दान करणं नाही असं आयशा म्हणते.

  • 18/26

    घटस्फोट म्हणजे जरी तुम्ही तुमचं सर्वोत्कृष्ट दिलं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फायदा होत नाही आणि हे ठीक आहे असंही ती सांगते.

  • 19/26

    घटस्फोट म्हणजे माझं एक उत्कृष्ट नातं होतं ज्याने मला नव्या नात्यांसोबत पुढे जाण्यासंबंधी खूप काही शिकवलं असं आयेशाने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

  • 20/26

    घटस्फोट म्हणजे मला वाटलं होतं त्याहून मी अधिक मजबूत आहे असं आयशा म्हणते.

  • 21/26

    घटस्फोटाला आपण देऊ तो अर्थ असतो असं सांगत आयशाने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 22/26

    ऑक्टोबर २०१२ मध्ये शिखर धवनने आयशा मुखर्जीसोबत लग्न केलं.

  • 23/26

    आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.

  • 24/26

    शिखर आणि आयेशा यांना एक सात वर्षाचा मुलगा असून त्याचं नाव जोरावर आहे. २०१४ मध्ये जोरावरचा जन्म झाला.

  • 25/26

    मेलबर्नमध्ये राहणारी आय़शा मुखर्जी लग्नाच्या नऊ वर्षांनी शिखर धवनपासून विभक्त होत आहे.

  • 26/26

    शिखर धवनकडून अद्याप यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. (All Photos: Instagram)

Web Title: Ayesha mukherjee on divorce with indian cricketer shikhar dhawan sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.