-
टी २० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
-
या वर्ल्डकपसाठी विराट कोहली (कर्णधार), रोहीत शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे.
-
तर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा टी २० विश्वचषक संघाचा मार्गदर्शक असणार आहे.
-
मात्र बीसीसीआयने टी २० विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा केल्यानंतर क्रिकेटमधील जाणकार आणि चाहत्यांनी चांगली कामगिरी करणाऱ्यांना डावलल्याचं मत व्यक्त केलं आहे.
-
बीसीसीआयने ओमान आणि यूएईमध्ये १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी १८ खेळाडूंचा समावेश असणारा संघ जाहीर केला आहे. यात १८ पैकी ३ खेळाडू हे राखीव असून एकूण १५ जणांचा चमू या दौऱ्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.
यात राखीव खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. -
तर सलामीवीर पृथ्वी शॉ, धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर या तिघांना भारतीय संघातून डावलण्यात आले आहे.
-
सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांना अनपेक्षित डच्चू मिळाला आहे.
-
या स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनची वर्णी लागली आहे. त्यामुळे अश्विनचे तब्बल चार वर्षांनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.
-
टी २० वर्ल्डकपसाठी पात्रता फेरीचे सामने २३ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत. या पात्रता फेरीत श्रीलंका, आयर्लंड आणि बांगलादेश हे संघ सहभागी होणार आहे.
-
प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या पात्रता फेरीतून चार संघ सुपर-१२ साठी पात्र ठरणार आहेत. (सर्व फोटो सौजन्य – ट्वीटर)
T20 World Cup: सिलेक्ट झालेले तर कळाले पण वगळलं कोणाला?; पाहा यादी
Web Title: India squad for t20 world cup 2021 which deserving players who miss or dropped out nrp