-
दोन्ही संघ २००७ मध्ये अंतिम सामन्यासह दोन वेळा समोरासमोर आले होते. साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ९ गडी बाद १४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर विजयी धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १४१ धावा करू शकला. त्यामुळे सामना ड्रा झाला आणि बॉल आउटमध्ये भारताने सामना ३-० ने जिंकला. (Photo- AP)
-
२००७ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं. पाकिस्तानला १५८ धावांचं लक्ष्य दिल्यानंतर भारतीय संघाने अंतिम सामना ५ धावांनी जिंकला होता. (Photo- Reuters)
-
२०१२ टी २० वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने आले. कोलंबोतील प्रेमदासा मैदानात पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १२८ धावांचं लक्ष्य ठेवलं होते. भारताने २ गडी गमवत लक्ष्य गाठलं होतं. (Photo- PTI)
-
२०१४ टी २० वर्ल्डकपमध्ये बांगलादेशच्या ढाकामध्ये दोन्ही संघात सामना रंगला होता. भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमवत १३० धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान ३ गडी गमवून पूर्ण केलं. (Photo- AP)
-
२०१६ टी २० वर्ल्डकपचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान विजयासाठी ११९ धावांचं आव्हान दिलं होतं. हे लक्ष्य भारताने ४ गडी गमवून पूर्ण केलं होतं. (Photo- Indian Express)
T20 WC: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांचा इतिहास; एका वर्ल्डकप स्पर्धेत दोनदा दिली मात
टी २० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान सामने पाच वेळा आमनेसामने आले आहेत. पाचही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. यावेळी दोन्ही संघ टी -२० विश्वचषकात सहाव्यांदा समोरासमोर येतील.
Web Title: T20 wc history of india vs pakistan matches rmt