-
नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकत १२१ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भारताला अॅथलेटिक्स प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळालं आहे. नीरजने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. तर दुसरीकडे भारताला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.
-
रवी कुमार दहिया गुरुवारी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये रौप्यपदक पटकावणारा भारताचा दुसरा मल्ल ठरला. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले
-
भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये संपवला. भारतीय हॉकी संघाच्या या विजयामध्ये गोलपोस्टवर एखाद्या भिंतीप्रमाणे उभा राहून विरोधी संघाची आक्रमणे परतवून लावणारा गोलकीपर पी. आर. श्रीजेशचं त्याच्या कामगिरीसाठी सर्वच स्तरामधून कौतुक झालं.
-
टोक्यो ऑलिम्पिक लव्हलिना बोर्गोहेन हीने कांस्यपदक पटकावलं. आता इस्तंबूल येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात थेट स्थान दिले जाणार आहे.
-
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिनं इतिहास रचत वैयक्तिक दुसरं पदक पटकावलं आहे. एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकत तिने इतिहास रचला आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
-
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत मनीष नरवाल याने सुवर्ण पदक पटकावलं.
-
टोक्यो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत कृष्णा नागरने सुवर्णपदक जिंकलं असून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
-
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले.
-
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला. एवढेच नव्हे, तर या कामगिरीसोबत सुमितने विश्वविक्रमही मोडला आहे. त्याने एफ-६४ प्रकारात ६८.५५ मीटर लांब भाल फेकत विश्वविक्रम आपल्या नावावर केला.
-
क्रिकेटपटू मिताली राजने आतापर्यंत १२ कसोटी, २२० एकदिवसीय आणि ८९ टी २० सामने खेळले आहेत. कसोटीत ६९९ धावा, एकदिवसीय सामन्यात ७,३९१ धावा आणि टी २० स्पर्धेत २३६४ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात ८ गडी बाद केले आहेत.
-
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचं नावही खेलरत्न पुरस्कारसाठी घोषित केलं आहे. साफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत नेपाळविरुद्धच्या सामन्यात गोल झळकावल्यानंतर छेत्रीने ब्राझीलचा महान फुटबॉलपटून पेलेची बरोबरी केली होती. छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पेलेच्या ७७ गोलची बरोबरी केली आहे.
Khelratna: नीरज चोप्रा, रवि दहियासह ११ जणांना मिळणार खेलरत्न पुरस्कार; खेळाडूंची कामगिरी वाचा
नीरजसह टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम खेळी करणाऱ्या खेळाडूंची नाव या यादीत आहेत. पहिल्यांदाच ११ खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे
Web Title: 11 indian athlete and players awarded for khelratna award including neeraj chopra rmt