-
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. हे ९० च्या दशकातील एका टेनिसपटूने २० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालसोबत खेळून हे सिद्ध केलंय.
-
टेनिसच्या क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ज्याला ओळखलं जातं अशा २० वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदालसोबत एकदा तरी खेळावं असं स्वप्न या ९७ वर्षीय खेळाडूने पाहिलं होतं.
-
राफेल नदालच्या स्वभावामुळेही टेनिसप्रेमींना त्याची भूरळ पडली आहे. अजुनही राफेल त्याच्या चाहत्यांना विसरला नाही. या ९७ वर्षीय फॅनचं स्वप्न राफेलने पूर्ण केलंय. याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.
-
९७ वर्षीय टेनिस खेळाडू नुकतंच राफा नदाल अकादमीमध्ये राफेलच्या भेटीसाठी आले होते. युक्रेनियन खेळाडू लिओनिड स्टॅनिस्लावस्की असं या चाहत्याचं नाव असून आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF)चे जगातील सर्वात वयोवृद्ध खेळाडू होण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या चाहत्याच्या नावावर आहे.
-
स्टॅनिस्लावस्की यांचं वय असूनही कोर्टमध्ये सुरेख चेंडू मारून आपल्या आवडत्या खेळाडूसोबत खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला. Rafa Nadal Academy by Movistar या ट्विटर हॅंडलवरून या सुंदर सामन्याचे काही फोटोज आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
-
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील लोक ९७ वर्षीय खेळाडूच्या चेहऱ्यावरील गोड हावभाव आणि आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद पाहून भावूक होत आहेत. त्यांची जिद्द पाहून त्यांचं भरभरून कौतूक करण्यात येत आहे. (ALL Photos: Instagram/ rafanadalacademy)
Viral Photos: राफेल नदालने ९७ वर्षीय फॅनचं स्वप्न केलं पूर्ण, दोघांमध्ये असा रंगला सामना…
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं. आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो…हे पटवून देणारा हे फोटोज एकदा नक्की पाहा.
Web Title: Rafael nadal plays an adorable point against a 97 year old tennis player leonid stanislavskyi trending globally viral video social media prp