• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. who is ajaz patel new zealand baller who took all wickets of team india ind vs nz test vsk

त्यानं टीम इंडियाला रडवलं, तरी भारतात होतेय त्याचीच हवा! कोण आहे हा एजाज पटेल? जाणून घ्या…

Updated: December 4, 2021 17:32 IST
Follow Us
  • वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरीच जणू. याच मैदानावर एक इतिहास घडला. भारत न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात संपूर्ण भारतीय संघाला न्यूझीलंडच्या एकाच गोलंदाजानं चितपट केलं, तो म्हणजे एजाज पटेल.
    1/10

    वानखेडे स्टेडियम म्हणजे भारतीय क्रिकेटची पंढरीच जणू. याच मैदानावर एक इतिहास घडला. भारत न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात संपूर्ण भारतीय संघाला न्यूझीलंडच्या एकाच गोलंदाजानं चितपट केलं, तो म्हणजे एजाज पटेल.

  • 2/10

    याआधी कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम इंग्लंडचे जिम लेकर आणि भारताचे अनिल कुंबळे यांच्या नावावर होता. आता त्यात एजाजचं नावही समाविष्ट झालं आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया एजाजबद्दलच्या काही गोष्टी…

  • 3/10

    ९ कसोटी, ७ ट्वेन्टी-20 सामन्यात ३३ वर्षीय एजाजने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. एजाजचा जन्म मुंबईचा पण आठव्या वर्षी आईवडिलांसह तो न्यूझीलंडला रवाना झाला.

  • 4/10

    त्याच्या वडिलांनी तिथे गॅरेज उभारलं. त्याची आई मुंबईत असताना शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती.

  • 5/10

    वेगवान गोलंदाज म्हणून एजाजनं खेळायला सुरुवात केली. प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार एजाज फिरकी गोलंदाज झाला. ६८ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये त्याने २५१ विकेट्स घेतल्या.

  • 6/10

    न्यूझीलंडच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर एजाजला तीन वर्षांपूर्वी पदार्पणाची संधी मिळाली.

  • 7/10

    पदार्पणाच्या कसोटीतच ७ विकेट्स घेत एजाजने ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला होता.

  • 8/10

    एजाजचा न्यूझीलंड संघातील सहकारी मिचेल मक्लेघान आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी खेळायचा. मिचेलच्या निमित्ताने एजाजला मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये नेट बॉलर म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती.

  • 9/10

    मिचेल मुंबई इंडियन्स संघाचा भाग असताना एजाज वानखेडे स्टेडियमवर काही सामने पाहायला आला होता. कौटुंबिक सोहळ्यांसाठीही एजाज मुंबईत नियमितपणे येत असतो.

  • 10/10

    आयसीसीने ‘नाव लक्षात ठेवा’ म्हणून एजाजचं कौतुक करत ट्वीट केलं आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही एजाजवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title: Who is ajaz patel new zealand baller who took all wickets of team india ind vs nz test vsk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.