-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील साखळी सामने संपले असून आता सर्वांनाच अंतिम सामन्याचे वेध लागले आहे. या हंगामात अनेक तरुण खेळाडूंनी पदापर्णातच दिमाखदार कामगिरी केली आहे.
-
तर या हंगामात काही दिग्गज फलंदाज आणि गोलंदाज चमक दाखवू शकलेले नाहीत. अनेक खेळाडू या पर्वात प्लॉप ठरले आहेत.
-
यामध्ये पहिल्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे आहे. तो या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला. मात्र या हंगामात दुखापत झाल्यामुळे तो फक्त ७ सामने खेळू शकला. त्याने सात सामन्यांत फक्त ११४ धावा केल्या.
-
तसेच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मादेखील या हंगामात चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याने १४ सामन्यात फक्त २६८ धावा केल्या आहेत.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणारा विराट कोहली हा खेळाडूदेखील या हंगामात फ्लॉप ठरला. त्याला एकूण १४ सामन्यांत फक्त ३०९ धावा करता आल्या. या पर्वात बंगळुरु संघ प्लेऑफर्यंत पोहोचू शकलेला आहे.
-
पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल या पर्वात चांगला खेळ दाखवू शकला नाही. त्याचा संघ प्लेऑफर्यंत पोहोचू शकला नाही. त्याने एकूण १३ सामन्यांमध्ये फक्त १९६ धावा केल्या.
-
रविंद्र जडेजाकडे या पर्वाच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
-
मात्र त्याचा संघ प्लेऑफर्यंत पोहोचू शकला नाही. जडेजादेखील एकूण दहा सामन्यात फक्त ११६ धावा करु शकला.
-
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यरदेखील चांगली फलंदाजी करू शकला नाही. त्याने १२ सामन्यात १८२ धावा केल्या.
आयपीएल २०२२ मध्ये तरुण खेळाडू तळपले, पण ‘हे’ दिग्गज मात्र ठरले फ्लॉप
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मादेखील या हंगामात चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याने १४ सामन्यात फक्त २६८ धावा केल्या आहेत.
Web Title: Virat kohli rohit sharma shreyas iyer players flop in ipl 2022 prd