• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. team india enjoyed vacation in dubai before super 4 match in asia cup 2022 spb

Asia cup 2022 : सुपर ४ च्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने दुबईत घेतला सुट्टीचा आनंद, पाहा PHOTOS

सुपर ४ च्या सामन्याला काही दिवस वेळ असल्याने भारतीय क्रिकेटपटूंनी गुरुवारी (१ सप्टेंबर) दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेतला.

September 2, 2022 15:53 IST
Follow Us
  • indian team
    1/12

    दुबईत सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आता साखळी सामन्यातील शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग यांच्या आज (शुक्रवारी) होणार आहे.

  • 2/12

    या पैकी जो संघ जिंकेल तो सुपर ४ मध्ये सहभागी होईल. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात भारताने ४० धावांनी विजय मिळवत सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.

  • 3/12

    दरम्यान, सुपर ४ च्या सामन्यांना काही दिवस वेळ असल्याने भारतीय क्रिकेटपटूंनी गुरुवारी (१ सप्टेंबर) दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेतला.

  • 4/12

    यावेळी भारतीय खेळाडूंना सर्फिंग आणि बीच व्हॉलीबॉल खेळताना दिसले.

  • 5/12

    भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख फलंदाज विराट कोहली राफटींगचा आनंद घेतला.

  • 6/12

    तर अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी समुद्र किनारी बसून वेळ घालवला.

  • 7/12

    भारतीय संघाचा हा व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट केला.

  • 8/12

    या व्हिडीओला When #TeamIndia hit ?.?.?.?.?.?! ? Time for some surf, sand & beach volley! ?, असे कॅप्शन देण्यात आले आहे.

  • 9/12

    सुट्टीचा दिवस असल्याने राहुल द्रविड सरांनी ठरवले की आपण काही आगळंवेगळं करावं. आम्ही खूप मजा केली. प्रत्येकजण आनंदी आणि उत्साही होता, अशी प्रतिक्रिया यझुर्वेंद्र चहलने या व्हिडीओत दिली.

  • 10/12

    भारत सुपर ४चा पहिला सामना रविवारी (४ सप्टेंबर) दुबईत खेळणार आहे. परंतु भारताचा सामना कोणाशी असेल हे आज पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग सामन्यानंतर निश्चित होईल.

  • 11/12

    पाकिस्तानच्या तुलनेत हाँगकाँगचा संघ थोडा दुबळा आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान जिंकण्याची शक्यता जास्त आहे.

  • 12/12

    त्यामुळे आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या पूर्वी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.

  • फोटो सौजन्य – बीसीसीआय अधिकृत ट्वीटर खाते
TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025

Web Title: Team india enjoyed vacation in dubai before super 4 match in asia cup 2022 spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.