-
फिटनेस राखण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू केवळ जिममध्ये तासनतास घाम गाळत नाहीत तर त्यांच्या आहाराचीही खूप काळजी घेतात. असे काही क्रिकेटर्स आहेत जे शाकाहारी आहाराचे पालन करतात. त्याच वेळी, काही कारणास्तव, काही लोकांनी मांसाहार सोडला आणि शाकाहारी आहार सुरू केला. चला जाणून घेऊया त्या क्रिकेटपटूंबद्दल.
-
विराट कोहलीला लहानपणी बिर्याणी खायला खूप आवडत असे. पण २०१८ मध्ये विराट कोहलीने मांसाहार सोडला. एवढेच नाही तर तो आता दूध, दही, तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खात नाही. (Source: Virat Kohli/Instagram)
-
त्याने सांगितले होते की त्याला सर्वाइकल स्पाइनचा त्रास होत आहे आणि त्याच्या शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण सतत वाढत आहे. यामुळे त्याने नॉनव्हेज खाणे बंद केले. (Source: Virat Kohli/Instagram)
-
या यादीत हार्दिक पांड्याचेही नाव आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्याने काही वर्षांपूर्वी मांसाहार सोडला होता. तो आता पूर्णपणे शाकाहारी आहार घेतो. (Source: Hardik Pandya/Instagram)
-
रोहित शर्माही पूर्वी मांसाहार करायचा. हिटमॅनला त्याच्या फिटनेसमुळे अनेकदा ट्रोल करण्यात आले. यामुळे त्याने आपला आहार बदलला आणि आता तो पूर्णपणे शाकाहारी आहार घेतो. (Source: Rohit Sharma/Instagram)
-
शिखर धवनने २०१८ मध्ये मांसाहार सोडला आणि फक्त शाकाहारी आहार घेण्यास सुरुवात केली. त्यांनी सांगितले होते की, मांसाहारामुळे त्याला नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली. स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी त्यानी शाकाहारी आहारावर भर दिला. (Source: Shikhar Dhawan/Instagram)
-
इशांत शर्माला एकेकाळी मांसाहाराची आवड होती. पण एकदा त्याने बाजारात कोंबड्यांची निकृष्ट वागणूक पाहिली आणि त्याचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला. मग त्याने स्वतःला शाकाहारी बनवण्याचा निर्णय घेतला. आता इशांत पूर्णपणे शाकाहारी आहे. (Source: Ishant Sharma/Instagram)
-
युजवेंद्र चहललाही मांसाहार आवडायचा. चांदणी चौकात मिळणारे कबाब आणि बटर चिकन हे त्यांचे आवडते असल्याचे त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते. पण त्याने फिटनेस लक्षात घेऊन २०२० मध्ये पूर्णपणे शाकाहारी झाला. (Source: Yuzvendra Chahal/Instagram)
-
रविचंद्रन अश्विन लहानपणापासूनच शाकाहारी राहीला आहेत. पण पौष्टिकतेमुळे तो नॉनव्हेज खाऊ लागला, पण त्याला ते फारसे आवडले नाही. आता त्याने पुन्हा पूर्णपणे शाकाहारी आहार घेण्यास सुरुवात केली आहे. (Source: Ravichandran Ashwin/Instagram)
PHOTOS: कोणी नकारात्मक भावनेसाठी तर कोणी फिटनेससाठी, जाणून घ्या कोणत्या क्रिकेटपटूने का सोडला मांसाहार?
Indian Cricketers: मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतो. त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही दिसून आला आहे. टीम इंडियामध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे शाकाहारी आहाराचे पालन करतात तर काहींनी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी मांसाहार सोडला आहे.
Web Title: Find out which cricketers of team india including virat kohli are vegetarians and why they gave up nonveg vbm