• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. cyber security tips avoid using ban applications it will be harmful for data and mobile security scsg

मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक! बंदी घालण्यात आलेले Apps वापरणे अत्यंत धोकादायक; जाणून घ्या ११ महत्वाच्या गोष्टी

.apk फाइल्सवरुन हे अॅप वापरुन नका; जाणून घ्या यासंदर्भातील धोका काय

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • भारतातील चायनीज अ‍ॅप्लिकेशन बॅननंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामध्ये आपण बंद केलेली अ‍ॅप्लिकेशन कशी वापरू शकतो ह्याबद्दलसुद्धा मोठ्याप्रमाणावर सर्च केलं गेलं आहे. शिवाय असलेल्या डेटा बद्दल किंवा ज्यांचं ह्याआधीच अकाउंट आहे त्याबद्दलसुद्धा अनेक प्रश्न आहेत.अँड्रॉइडसाठी अ‍ॅप्लिकेशनची फाईल .apk फाईल असते तर आयओएस मध्ये तीच .ipa फाईल असते. ह्या पॅकेज फाईल्समध्ये अ‍ॅप्लिकेशनचा प्रोग्रॅम केलेला सोर्स कोड समाविष्ट केलेला असतो ज्याद्वारे अ‍ॅप्लिकेशन आपल्या फोन्स मध्ये व्यवस्थित चालते. गुगल प्ले स्टोअर किंवा अँपल अँप स्टोर वर जी अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध नाहीत ती बाहेरील वेबसाईटवरून डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे ह्याला साईडलोडींग म्हंटल जातं. यामध्ये .apk किंवा .ipa फाईल्स डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्या जातात, जो ट्रेंड आता पाहायला मिळू शकतो. मात्र या फाईल आणि जुने बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप्लिकेशन्स तुमच्या मोबाइलसाठी आणि खासगी डेटासाठी धोकादायक ठरु शकतात. यासंदर्भात काय काळजी घेतली पाहिजे सांगत आहेत स्वप्निल जोशी.... (सर्व फोटो प्रातिनिधिक)
    1/12

    भारतातील चायनीज अ‍ॅप्लिकेशन बॅननंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यामध्ये आपण बंद केलेली अ‍ॅप्लिकेशन कशी वापरू शकतो ह्याबद्दलसुद्धा मोठ्याप्रमाणावर सर्च केलं गेलं आहे. शिवाय असलेल्या डेटा बद्दल किंवा ज्यांचं ह्याआधीच अकाउंट आहे त्याबद्दलसुद्धा अनेक प्रश्न आहेत.अँड्रॉइडसाठी अ‍ॅप्लिकेशनची फाईल .apk फाईल असते तर आयओएस मध्ये तीच .ipa फाईल असते. ह्या पॅकेज फाईल्समध्ये अ‍ॅप्लिकेशनचा प्रोग्रॅम केलेला सोर्स कोड समाविष्ट केलेला असतो ज्याद्वारे अ‍ॅप्लिकेशन आपल्या फोन्स मध्ये व्यवस्थित चालते. गुगल प्ले स्टोअर किंवा अँपल अँप स्टोर वर जी अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध नाहीत ती बाहेरील वेबसाईटवरून डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे ह्याला साईडलोडींग म्हंटल जातं. यामध्ये .apk किंवा .ipa फाईल्स डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्या जातात, जो ट्रेंड आता पाहायला मिळू शकतो. मात्र या फाईल आणि जुने बंदी घालण्यात आलेले अ‍ॅप्लिकेशन्स तुमच्या मोबाइलसाठी आणि खासगी डेटासाठी धोकादायक ठरु शकतात. यासंदर्भात काय काळजी घेतली पाहिजे सांगत आहेत स्वप्निल जोशी…. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

  • 2/12

    १. सर्व्हरशी कनेक्शन गेलं: अ‍ॅप्लिकेशन बॅन झाली आहेत ह्याचा अर्थ भारतासाठी गुगल प्ले स्टोर आणि अँपल अँप स्टोरवर ती अधिकृतरित्या उपलब्ध नाहीत, त्याचबरोबर भारताच्या सायबरस्पेसमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून अधिकृतरीत्या बॅन केलेल्या अ‍ॅप्लिकेशनना त्यांच्या सर्व्हरशी कोणताही संपर्क आता प्रस्थापित करता येणार नाही. थोडक्यात ही अ‍ॅप्लिकेशन भारतीय युझर्सला अपडेट करता येणार नाहीत. 

  • 3/12

    २. अनइस्टॉल करा:  जी अ‍ॅप्लिकेशन बॅन केली आहेत, ती आपल्या मोबाईलमधून त्वरीत काढून टाकणे (अनइनस्टॉल) हेच हितकारक आहे, कारण ह्या अ‍ॅप्लिकेशनच्या सुरक्षेबाबत २०१८ सालापासून विविध देशांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • 4/12

    ३. फॅक्टरी रिसेट: अ‍ॅप्लिकेशन काढून टाकल्यावर शक्यतो आपल्या फोन चा व्यवस्थित बॅकअप घेऊन फोन फॅक्टरी रिसेट देखील करून घ्यावा, कारण अनइनस्टॉल केल्यावरही अ‍ॅप्लिकेशनच्या पॅकेज मधील काही फाईल्स फोन मध्ये तशाच राहू शकतात जे की सुरक्षेच्या दृष्टीने अहितकारक आहे.

  • 5/12

    ४. अनधिकृत डाउनलोड टाळा: बॅन केलेली अ‍ॅप्लिकेशन वापरण्याचा प्रयत्न अन्य कोणत्याही साईडलोडींग सारख्या पर्यायाने करू नये. कारण ह्या प्रकारात अ‍ॅप्लिकेशन फाईल ही अनधिकृत सोर्स किंवा वेबसाईटवरून आलेली असल्यामुळे, तिच्या पॅकेजमध्ये कोणते बदल झाले आहेत ह्याची पडताळणी झालेली नसते. हे आपल्या फोन साठी घातक ठरू शकते. शिवाय आपल्याला जुन्या अ‍ॅप्लिकेशन व्हर्जन ची फाईलसुद्धा मिळू शकते जिच्यामध्ये काही सिक्युरिटी प्रॉब्लेम्स असतील तर ते तसेच आपल्या फोनमध्ये शिरकाव करू शकतात ज्याद्वारे सायबर हल्लेखोर आपल्या फोन चा ताबा घेऊ शकतात.

  • 6/12

    ५. व्हिपीएनचा वापर करु नका : बॅन केलेली अ‍ॅप्लिकेशन आपल्या फोन मध्ये यापूर्वीच इन्स्टॉल केलेली असतील तर कोणत्याही अनधिकृत पर्यायाचा वापर करून त्यांचा सर्व्हरशी संपर्क स्थापित करायचा प्रयत्न करू नये. इंटरनेटवर व्हीपीएन किंवा प्रॉक्सीसारखे पर्याय आपल्या दिले जातात परंतु हे पर्याय वापरण्यासाठी पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे, आणि हे पर्याय तितकेच धोकादायक सुद्धा ठरू शकतात.

  • 7/12

    ६. भारतीय अ‍ॅप्लिकेशन समजून घ्या आणि मगच…: आता जी पर्यायी अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध झाली आहेत किंवा जी अ‍ॅप्लिकेशन भारतीय आहेत असं सांगितलं जातंय त्याची सत्यता पूर्णतः पडताळून पाहिल्याशिवाय फोनमध्ये इन्स्टॉल करू नयेत. अ‍ॅप्लिकेशन भारतीय आहे म्हणजे ते फक्त भारतात डेव्हलप झालंय की त्यावरील डेटा हा भारतातच राहणार आहे ह्यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे.

  • 8/12

    ७. साइन इन करताना काळजी घ्या कारण: कोणत्याही नवीन अ‍ॅप्लिकेशनवर साइन इन करत असाल आणि ते जरुरीचे अ‍ॅप्लिकेशन म्हणजे बँकिंग किंवा इतर आवश्यक सेवा ह्यातील नसेल, तर आपला अधिकृत ई-मेल किंवा मोबाईल नंबर तेथे देऊ नये. त्यासाठी एक पर्यायी ई-मेल ऍड्रेस तयार करावा आणि आपल्या फोनमध्ये सेटिंग्समध्ये त्या ईमेल अकाउंट साठी सिंकचा पर्याय बंद करून ठेवावा. म्हणजे त्या अकाउंटवर आपल्या फोन मधील काँटॅक्ट्स किंवा इतर महत्वाची माहिती साठवली जाणार नाही.

  • 9/12

    ८. कोणत्या परमिशन देता ते पाहा: कोणतेही नवीन अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करतांना कोणकोणत्या पर्मिशन्स आपल्याकडून घेतल्या जातात ते तपासून घ्यावे. काही अ‍ॅप्लिकेशन आपली परवानगी न घेता लोकेशन चा ऍक्सेस घेतात, जे सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक आहे.नवीन अ‍ॅप्लिकेशन काहीवेळा दुसऱ्या अ‍ॅप्लिकेशनचासुद्धा ऍक्सेस घेऊ शकते त्यामुळे तेही तपासून पाहणे गरजेचे आहे.

  • 10/12

    ९. पासर्वडबद्दल सावधान: आपल्या अधिकृत ई-मेल चा पासवर्ड किंवा फोनचा पिन हा इतर अ‍ॅप्लिकेशनवर ठेऊ नये तर त्यासाठी वेगळा पासवर्ड सेट करून ठेवावा.

  • 11/12

    १०. तर दोन फोन ठेवा: आपण जर कन्टेन्ट क्रिएटर असाल आणि त्यासंदर्भातील अप्लिकेशनचा जास्त वापर आपल्याकडून होत असेल तर एक पर्यायी फोन घेऊन त्याद्वारे फक्त त्याच अप्लिकेशनचा वापर करावा. त्या फोनवर बाकी काँटॅक्ट्स किंवा इतर माहिती ठेऊ नये, म्हणजे जरी अप्लिकेशनच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर आपला कन्टेन्ट वगळता बाकी कोणतीही खाजगी माहिती अप्लिकेशन पर्यंत सहजासहजी पोहोचणार नाही.

  • 12/12

    ११. कागदपत्रांबद्दल ही काळजी घ्या: कोणत्याही डॉक्युमेंट स्कॅनिंग अप्लिकेशनवर किंवा फाईल कन्हवर्जन अप्लिकेशनवर आपली खाजगी माहिती असणारी फाईल स्कॅन किंवा अपलोड करू नये, कारण ती फाईल त्या अप्लिकेशनच्या सर्व्हरवर स्टोर होण्याची शक्यता जास्त असते, पर्याय म्हणून आपल्या फोनमधून डॉक्युमेंटचा फोटो काढून विना इंटरनेट पीडीएफ कन्व्हर्ट करणारी जी अप्लिकेशन बाजारात उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा, ज्याद्वारे आपले डॉक्युमेंट सुरक्षित राहू शकेल.

Web Title: Cyber security tips avoid using ban applications it will be harmful for data and mobile security scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.