-
कारदेखो हे देशातील सर्वात मोठे ऑटो सर्च प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना ऑनलाइन कार खरेदी करण्यात मदत करते. CarDekho, BikeDekho, PriceDekho ची मूळ कंपनी गिरनार सॉफ्ट असून यामध्येही रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. (Photo-indian express )
-
लेन्सकार्ट (Lenskart) हा एक लोकप्रिय ऑनलाइन चष्मा विक्रेता आहे. टाटांनी एप्रिल २०१६ मध्ये यामध्ये गुंतवणूक केली होती. (Photo-indian express )
-
रतन टाटा यांनी २०१५ मध्ये पेटीएममध्ये गुंतवणूक केली. हे एक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. पेटीएम आज सर्वांच्याच मोबाईलमध्ये आढळतात. अनेक लोक जवळपास पेटीएमवरुनच पैशांचे ट्रान्झ्रॅक्शन करतात. (Photo-indian express )
-
स्नॅपडील ही पहिली ई-कॉमर्स कंपनी आहे. ज्यामध्ये रतन टाटांनी गुंतवणूक केली. ऑगस्ट २०१४4 मध्ये त्यांनी स्नॅपडीलमध्ये ०.१७ टक्के स्टॉक घेतल्याचे मानले जाते. रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांनी ५कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केली होती. (Photo-indian express )
-
डिसेंबर२०१५ मध्ये अर्बन कंपनीत रतन टाटा यांच्याकडून गुंतवणूक करण्यात आली होती. अर्बन कंपनी ही गुडगाव आधारित सेवा बाजारपेठ आहे. (Photo-indian express )
-
अर्बन लॅडर हा बेंगळुरू स्थित ऑनलाइन फर्निचर किरकोळ विक्रेता आहे. ऑनलाइन फर्निचरने नोव्हेंबर २०१५ मध्ये रतन टाटा यांच्याकडून निधी मिळवला. स्नॅपडीलनंतर ई-कॉमर्स फर्ममध्ये रतन टाटा यांची ही दुसरी खाजगी गुंतवणूक होती. (Photo-indian express )
तुम्ही वापरत असलेल्या ‘या’ अॅप्समध्ये रतन टाटांचे मोठे योगदान; जाणून घ्या कोणते आहेत हे अॅप्स
उद्योगपती रतन टाटा यांनी पेटीएम पासून ते स्नॅपडीलपर्यंत अनेक अॅप्समध्ये गुंतवणूक केली आहे. अशाच काही अॅप्सची माहिती जाणून घेऊया.
Web Title: Ratan tatas big contribution to many of the apps you use pdb