• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. do this thing while doing transaction through qr code scan otherwise there will be big fraud pdb

Photos: QR Code स्कॅनद्वारे Transaction करताय? करा ‘हे’ काम, नाहीतर होणार मोठी फसवणूक

QR Code Alert: डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ऑनलाईन फसवणुकीसाठी आता QR Code स्कॅनचा वापर स्कॅमर्सकडून करण्यात येत आहे. त्यामुळे QR कोड स्कॅन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घ्या.

November 22, 2022 15:25 IST
Follow Us
  • UPI-Payment-Limit
    1/9

    सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकजण ऑनलाइन पेमेंटचा वापर करतो. पण अनेकदा या डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत असतात.

  • 2/9

    ऑनलाईन फसवणुकीसाठी आता QR Code स्कॅनचा वापर स्कॅमर्सकडून करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.

  • 3/9

    क्यूआर कोड स्कॅन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून या प्रकारची फसवणूक टाळता येईल. 

  • 4/9

    क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहकाच्या बँक खात्यातून किंवा वॉलेटमधून पैसे डेबिट केले जातात. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर कोणी तुम्हाला पैसे पाठवण्याचा दावा करत असेल तर, ती फसवणूक असू शकते. अशा वेळी सावध राहण्याची गरज आहे.

  • 5/9

    QR कोड स्कॅन केला असता जर तो तुम्हाला अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंकवर घेऊन जात असेल तर तुम्हाला अशा लिंक्समधून बाहेर पडावे लागेल.

  • 6/9

    कारण असे अॅप्स तुमच्या फोनमधील स्पायवेअर डाउनलोड करू शकतात आणि तुमची गोपनीय माहिती चोरू शकतात आणि तुम्हाला असुरक्षित बनवू शकतात.

  • 7/9

    शक्यतो ऑनलाईन पैसे देताना दुकानदाराचा नंबर घेऊनच त्या नंबरवर ट्रॅन्झॅक्शन करा. जर आपण क्यू आर कोड स्कॅन करुन पैसे देणार असाल तर कोड स्कॅन केल्यानंतर आलेले नाव हे दुकानदाराला दाखवून कन्फर्म करुन घ्या. त्यामुळे अशा पद्धतीची फसवणूक होण्यापासून तुम्ही वाचू शकतात. (Photo-pixabay)

  • 8/9

    पेट्रोल पंप किंवा इतर दुकानांमध्ये QR Code स्कॅन करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी अनेकदा स्कॅमर्स दुकानदाराचे क्यू आर कोड बदलून आपले क्यू आर कोड लावतात आणि त्यामुळे व्यवहार करताना पैसे थेट स्कॅमर्सच्या बँक अकाऊंटमध्ये जातात.  (Photo-pixabay)

  • 9/9

    जर कोणी तुम्हाला QR कोड स्कॅन करून पैसे घेण्यास सांगत असेल तर, अशा लोकांपासून सावध रहा आणि तसे करू नका. थर्ड पार्टी अॅपवर दिलेला QR कोड स्कॅन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
    (Photo-File Photo)

TOPICS
ऑनलाइन फ्रॉडOnline FraudपेमेंटPayment

Web Title: Do this thing while doing transaction through qr code scan otherwise there will be big fraud pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.