-
इंटरनेट वापरताना वारंवार स्क्रीनवर येणाऱ्या जाहिरातींमुळे सर्फिंगचा मजाच संपतो. (source – pixabay)
-
चित्रपट, व्हिडिओ पाहताना किंवा माहिती शोधताना या अॅड्स मध्येच उद्भवतात, ज्यामुळे अनेकदा चिडही येते. (source – pixabay)
-
त्यांना स्क्रीनवरून हटवणेही कठीण जाते. परंतु, एका उपायाद्वारे तुम्ही या जाहिरातींपासून सुटका मिळवू शकता. ते कसे होणार. जाणून घेऊया. (source – pixabay)
-
जाहिराती बंद करण्यासाठी कोणतेही अॅप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. स्मार्टफोनच्या सेटिंग्सद्वारे तुम्ही जाहिराती दिसणे बंद करू शकता. (source – pixabay)
-
स्मार्टफोनमधील सेटिंग्सद्वारे जाहिराती बंद करा (source – pixabay)
-
जाहिराती दिसणे बंद करण्यासाठी तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन प्रायव्हेट डिएनएस बंद करू शकता. (source – pixabay)
-
आयओएसमध्ये जाहिराती बंद करण्यासाठी वेगळे अॅप डाऊनलोड करावे लागते. (source – pixabay)
-
जाहिराती दिसणे बंद करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. (source – pixabay)
-
स्मार्टफोनमधील सेटिंग्स बटनवर क्लिक करा. (source – pixabay)
-
त्यानंतर येथे प्रायव्हेट डीएनएस सर्च करा. कनेक्शन आणि शेअरींमध्येही जाऊन तुम्ही ते शोधू शकता. (source – pixabay)
-
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय मिळतील. (source – pixabay)
-
ऑफ, ऑटोमॅटिक आणि प्रायव्हेट डीएनएसपैकी केवळ प्रायव्हेट डीएनएसवर क्लिक करा. (source – pixabay)
-
त्यात dns.adguard.com टाइप करा. आता सेव्ह करा. तुम्हाला जाहिरात दिसून येणार नाही. (source – pixabay)
-
सेटिंग्समध्ये बदल केल्यानंतर गुगल क्रोम ब्राऊजरवर कोणतेही संकेतस्थळ उघडून पाहा. त्यात जाहिरात असलेल्या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा दिसून येईल. (source – pixabay)
-
असे असले तरी फेसबुक आणि युट्यूबवर तुम्हाला जाहिराती दिसू शकतात. कारण ही प्रक्रिया केवळ स्मार्टफोनसाठी आहे. (source – pixabay)
स्मार्टफोनमधील जाहिरातींमुळे त्रासलात? बंद करण्यासाठी करा ‘हा’ उपाय
How to remove ads from smartphone : इंटरनेट वापरताना वारंवार स्क्रीनवर येणाऱ्या जाहिरातींमुळे सर्फिंगचा मजाच संपतो. त्यांना स्क्रीनवरून हटवणेही कठीण जाते. परंतु, एका उपायाद्वारे तुम्ही या जाहिरातींपासून सुटका मिळवू शकता. ते कसे होणार. जाणून घेऊया.
Web Title: How to remove ads from smartphone ssb