भारतीय बाजारपेठेमध्ये शिओमीला जोरदार मागणी असून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिजाईन आणि अद्ययावत तंत्रज्ञानासाठी हा फोन ओळखला जातो. रेडमी नोट ४ ला या क्षेत्रातील समीक्षकांनी पसंती दिली आहे. अनेक दिवसानंतर अत्यंत भरवशाचा आणि अद्ययावत फोन बाजारात आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हा फोन ३ व्हॅरियंट्समध्ये उपलब्ध झाला आहे. २ जीबी, ३ जीबी आणि ४ जीबी या व्हॅरियंट्समध्ये हा फोन उपलब्ध आहे. २ जीबी रॅम (३२ जीबी इंटरनल मेमरी) ची किंमत ९,९९९ रुपये, ३ जीबी रॅम (३२ जीबी इंटरनल मेमरी)ची किंमत १०,९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम (६४ जीबी इंटरनल मेमरी) ची किंमत १२,९९९ रुपये आहे. शिओमी रेडमी नोटला फिंगरप्रिंट स्कॅनर आणि इन्फ्रारेड सेन्सरदेखील आहे. जीपीआरएस, ब्लूटूथ आणि ३जी, ४ जी ही कनेक्टिविटीची साधने या फोनवर उपलब्ध आहेत. शिओमी रेडमीला १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. ४,१०० एमएएच बॅटरी आहे. अॅंड्रॉइड मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टमवर हा फोन चालतो.
शिओमी रेडमी नोट ४ ! वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्ययावत
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिजाइन आणि अद्ययावत तंत्रज्ञानासाठी रेडमी नोट ओळखला जातो.
Web Title: Redmi note 4 flipkart sale on flipkart 4 gb ram smartphone