-
आषाढी एकादशीनिमित्त पढरपुरात भक्तांचा महापूर लोटला आहे. लाडक्या विठुरायाचे दर्शन आणि चंद्रभागेतील पवित्र स्नान वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असते. चंद्रभागेच्या पात्रात आज सकाळी वारकरी भक्तांनी स्नानासाठी गर्दी केली होती. (छायाचित्र: अरूण बाबर, पंढरपूर)
-
आषाढी एकादशीनिमित्त सुमारे १० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. (सर्व छायाचित्रे: अरूण बाबर, पंढरपूर)
-
विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आलेला प्रत्येक वारकरी मोठ्या भक्तिभावाने चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नान करतो. (छायाचित्र: अरूण बाबर, पंढरपूर)
-
चंद्रभागा नदी पात्राच्या बाजूला राज्यभरातून आलेल्या विविध दिंडींकडून भजन तसेच विविध खेळ खेळले जातात.
-
हाती ध्वज, पताका घेऊन शेकडो किलोमीटरची पायपीट करून वारकरी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेला आहे.
-
चंद्रभागा नदीत स्नान केल्यानंतर मंदिरात जाण्याच्या लगबगीत असलेले वारकरी
जरी बाप साऱ्या जगाचा, तरी तू आम्हा लेकरांची विठू माऊली
आषाढी एकादशीनिमित्त सुमारे १० लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.
Web Title: Pandharpur wari 2018 vitthal rukhmini temple warkari