-
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे.
-
या दहा दिवसाच्या लॉकडाउननंतर २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाउन नसेल, अशी सूचक माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे.
-
परंतु, लॉकडाउनच्या काळात विनाकारण दुकाचीवरून फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहेच. त्याचसोबत पोलिसांना विशिष्ट प्रकराच्या कॅमऱ्याचीही साथ मिळाली आहे.
-
अतिशय छोट्या आकाराचा (Compact surveillance cameras) कॅमेरा आपल्या अंगावर लटकवून वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करताना दिसून आले.
-
या विशिष्ट कॅमेऱ्याची आणि कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलिसांची छबी इंडियन एक्सप्रेसचे फोटोग्राफर आशिष काळे यांनी टिपली.
पोलिसांचा नवा सोबती… खास गोष्टीच्या मदतीने पुणेकरांवर नजर
Web Title: Pune traffic police personnel use compact surveillance cameras for tracking vehicles during lockdown at shivajinagar vjb