गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आज सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस उजाडला आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीही गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. -
गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही शांततेत आणि अनेक नियमांचं पालन करुन भक्तांना बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे.
-
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन केले जाणार आहे.
सकाळी ११ वाजता कसबा गणपतीसह मानाच्या इतर चारही गणपतीचं विसर्जन केले जाणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातली सर्व दुकानं बंद राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. -
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आलेला आहे.
-
तर मानाच्या पहिल्या कसबा गणपतीसमोर राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने करोना महामारीसंदर्भातली रांगोळी साकारण्यात आली आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांनी मंदिरासमोर गर्दी केली आहे.
-
मुंबईतील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचं विसर्जनही यंदा कोणताही गाजावाजा न करता होणार आहे.
दुपारी १२ ते सायंकाळी ५.३० या वेळात नेहमीच्या मार्गाने ट्रकवरुन मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येईल. -
यादरम्यान कोणतीही मिरवणूक नसून पदयात्राही काढण्यात येणार नाही.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गात कोणत्याही भाविकाला रस्त्यावर येऊन दर्शन घेता येणार नाही. फुटपाथच्या आतच उभं राहून भाविकांना आपल्या आराध्याचं दर्शन घेता येणार आहे.
पुढच्या वर्षी लवकर या…; मुंबईसह पुण्यात गणेश विसर्जनाची जय्यत तयारी
Web Title: Ganesh visarjan 2021 mumbai lalbagcha raja pune dagdusheth ganpati visarjan sohala nrp