-

सोसाट्याचा वारा आणि तुफान पावसाने सातारा व कराडमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला.
-
वेगवान वारे आणि विजांच्या प्रचंड कडकडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली.
-
झोपड्या, पत्र्याची घरे, उभी पिके जमीनदोस्त झाली.
-
अनेक गरिबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले, संसार उघड्यावर आले.
-
वादळी वारा व पावसाच्या तडाख्यासमोर घरावरील पत्रे तग धरू शकली नाहीत.
-
घरावरील छतच कोसळल्याने घऱातील वस्तूंचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले.
-
काही ठिकाणी तर घरावरील पत्रे अक्षरशा उडून गेली. त्यामुळे घरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.
-
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती.
-
या अवकाळी पावासाची फटका महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला देखील बसला.
-
पावसामुळे शाहू स्टेडियम येथील कुस्ती मैदानाचे मोठे नुकसान झाल्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आली.
-
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा बाळासाहेब लांडगे यांनी ही माहिती दिली.
-
अचानक आलेल्या पावसामुळे ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा लाईटचा मंडप कोसळला, आखाड्यातील माती वाहून गेली.
-
मॅट भिजले, स्टेडियममध्ये पाणी साठले आहे. यामुळे स्पर्धा पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
-
त्यामुळे सध्या हजारो मल्ल व कुस्ती शौकीनांचा हिरमोड झाला आहे.
-
सातारा तालीम संघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्यामध्ये यावर चर्चा सुरू आहे. याठिकाणी मॅटचे आणि मातीच्या आखाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
-
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
-
पावसाचे पाणी मॅटवर साचल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
-
शिवाय मैदानात देखील चिखल झाल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.
-
सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर एवढा भयानक होता की रस्त्यावरी झाडं उन्मळून पडल्याने वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले.
PHOTOS : सातारा, कराडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावासाची जोरदार हजेरी; महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला फटका!
फळबागांसह शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Web Title: Photo heavy rains with strong winds in satara karad maharashtra kesari wrestling competition postponed msr