Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. northeast india submerges under floods displace thousands spl

PHOTOS : आसामसह ईशान्य भारतात महापुराचे संकट, लाखो लोक बेघर; भूस्खलनाच्या विळख्यात प्राणीही अडकले! पाहा फोटो

आसाममध्ये महापुराच्या संकटाने लाखो लोक विस्थापित झाले आहेत तर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पीडितांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Updated: July 5, 2024 14:03 IST
Follow Us
  • assam, floods, northeast india, landslides, assam live update, northeast india weather report, indian express
    1/12

    आसामच्या कामरूप जिल्ह्यात आलेल्या भीषण महापुराने स्थानिक रहिवाशांच्या घरांना वेढा टाकला असून शेती पीकेही पाण्याखाली गेली आहेत. २९ जिल्ह्यांमधील १६.५० लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. (पीटीआय फोटो)

  • 2/12

    ⁠आसाममधील महापुराचे हे ड्रोन कॅमेराने टिपलेले छायाचित्र आहे. ब्रह्मपुत्रा, दिगारू आणि कोलोंग सारख्या प्रमुख नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 3/12

    आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटीमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करून बाधितांना संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. (पीटीआय फोटो)

  • 4/12

    आसामच्या मालीगाव परिसरातील भूभाग मोठ्या प्रमाणात जलमय झाला असून, पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. (पीटीआय फोटो)

  • 5/12

    आसामच्या बचाव पथकांचे मदतीचे प्रयत्न सुरू आहेत, अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी ही पथके अथक परिश्रम करत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 6/12

    ⁠ईशान्य भारतात आलेल्या महापूर आणि भूस्खलनामुळे गेल्या २४ तासात किमान आठ लोकांचा मृत्यू झाला आहे, मे पासून मृतांची संख्या ४६ वर पोहोचली आहे. (पीटीआय फोटो)

  • 7/12

    भूस्खलन आणि पुराचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे, तीन लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. (पीटीआय फोटो)

  • 8/12

    ⁠IMD ने पुढील तीन दिवस आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. (पीटीआय फोटो)

  • 9/12

    आसाममधील २८ जिल्ह्यांतील ११.३४ लाख लोक भीषण पूरस्थितीमुळे प्रभावित झाले असून काल (४जुलै) फक्त एका दिवसात ६.४४ लाख लोक प्रभावित झाले आहेत. (पीटीआय फोटो)

  • 10/12

    महापूर, भूस्खलन आणि मुसळधार पाऊस या तिहेरी संकटांशी एकाचवेळी स्थानिकांना लढावे लागत आहे. नागरिकांकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बोटींचा वापर सुरु आहे. (पीटीआय फोटो)

  • 11/12

    काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पुराच्या पाण्याने ११ वन्य प्राण्यांचा बळी घेतला आहे तर आणखी अडकलेल्या वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासाठी बचावपथके प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. (पीटीआय फोटो)

  • 12/12

    आतापर्यंत तब्बल ६५ प्राण्यांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश मिळाले आहे तर अनेकांचे जीव अजूनही धोक्यात आहेत. (पीटीआय फोटो) हेही पाहा- Hathras Stampede: पीडित कुटुंबीयांचा राहुल गांधींसमोर एकच आक्रोश! पाहा फोटो… 

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Northeast india submerges under floods displace thousands spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.