• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. dubai crown prince sheikh hamdan visits india names daughter hind know reason jshd import asc

PHOTO | दुबईच्या राजकुमाराने लेकीचं नाव ‘हिंद’ ठेवलंय, कारणही आहे खास

शेख हमदान यांनी त्यांच्या मुलीचे नाव हिंद बिंत हमदान बिन मोहम्मद अल मकतूम असे ठेवले आहे.

April 12, 2025 17:01 IST
Follow Us
  • Sheikh Hamdan daughter name reason
    1/14

    दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम ८ एप्रिल २०२५ रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दिल्लीत आले होते. दिल्ली विमानतळावर त्यांचं अतिशय भव्य आणि सांस्कृतिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. (एएनआय फोटो)

  • 2/14

    पारंपारिक भारतीय नृत्य आणि स्वागत समारंभ पाहताच ते इतके प्रभावित झाले की त्यांनी थेट खिशातून मोबाईल काढला आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद करू लागले. त्यांची ही कृती सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहे. (एएनआय फोटो)

  • 3/14

    भारताशी खास नाते, मुलीचे नाव ‘हिंद’
    शेख हमदान यांची भारत भेट ही केवळ एक राजकीय भेट नव्हे तर भावनिक संबंधांची गोष्ट देखील आहे. अलिकडेच शेख हमदान यांच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. त्यांच्या पत्नीला चौथे आपत्य झाले आहे. (एएनआय फोटो)

  • 4/14

    त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव हिंद बिंत हमदान बिन मोहम्मद अल मकतूम असे ठेवले आहे. या नावाची भारतात बरीच चर्चा झाली. त्यांनी आपल्या मुलीचे नाव ‘हिंद’ का ठेवले? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. (एएनआय फोटो)

  • 5/14

    ‘हिंद’ नावामागची गोष्ट
    या नावामागे एक कौटुंबिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे. ‘हिंद’ हे नाव शेख हमदान यांच्या आई शेखा हिंद बिंत मकतूम बिन जुमा अल मकतूम यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. (एएनआय फोटो)

  • 6/14

    अरब देशांमध्ये पालकांचा किंवा पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी मुलांची नावे ठेवताना जुन्या नावांचाच विचार केला जातो. ही तिकडची सामान्य परंपरा आहे. शेख हमदान त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. म्हणून त्यांनी त्यांच्या आईचे नाव त्यांच्या मुलीला दिले. (एएनआय फोटो)

  • 7/14

    इस्लामिक इतिहासातील संदर्भांनुसार आणि अरबी भाषेत ‘हिंद’ या शब्दाचे विशेष महत्त्व आहे. याचा अर्थ – उंटांचा समूह, सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे ‘हिंद’ हा शब्द ‘भारता’साठी देखील वापरला जातो. (एएनआय फोटो)

  • 8/14

    याचा अर्थ हे नाव केवळ कौटुंबिक सन्मानाशी संबंधित नाही तर ते भारतीय आणि अरब संस्कृतीमधील संबंधाचे प्रतीक देखील बनले आहे. (एएनआय फोटो)

  • 9/14

    शेख हमदान हे केवळ दुबईचे युवराज नाहीत तर ते एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. त्यांना त्यांचे साहित्यिक टोपणनाव ‘फज्जा’ म्हणूनही ओळखले जाते. (पीटीआय फोटो)

  • 10/14

    ते २००८ पासून दुबईचे क्राउन प्रिन्स आहेत आणि २०२४ मध्ये त्यांना यूएईचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. शेख हमदान यांना घोडेस्वारी, स्काय डायव्हिंग, स्कूबा डायव्हिंग आणि कविता लिहिण्याची आवड आहे. (पीटीआय फोटो)

  • 11/14

    त्यांच्या रोमँटिक आणि देशभक्तीपर कविता खूप प्रसिद्ध आहेत, ज्या ते ‘फज्जा’ या नावाने प्रकाशित करतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांची जीवनशैली लोकांना खूप आकर्षित करते. (एएनआय फोटो)

  • 12/14

    राजघराणे आणि खासगी जीवन
    शेख हमदान यांनी २०१९ मध्ये त्यांची चुलत बहीण शेखा शेखा बिंत सईद बिन थानी अल मकतूमशी लग्न केले. त्यांना चार मुले आहेत, ज्यामध्ये जुळ्या शेखा आणि रशीद (२०२१), मोहम्मद (२०२३) आणि आता मुलगी हिंद (२०२५). (पीटीआय फोटो)

  • 13/14

    त्यांचे कुटुंब युएईमधील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबांपैकी एक आहे. त्यांचे वडील शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हे दुबईचे शासक आणि एक प्रमुख रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. (एएनआय फोटो)

  • 14/14

    शेख हमदान यांचा हा भारत दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून पार पडला. या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर व संरक्षण मंत्री राजनाथ शिंह यांची भेट घेतली. भारत-यूएई व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी आयोजित केलेल्या व्यापार गोलमेज परिषदेत सहभागी झाले. ही भेट भारत आणि युएईमधील मैत्री, भागीदारी आणि सांस्कृतिक संबंधांना नवीन उंचीवर नेईल. (पीटीआय फोटो)

TOPICS
दुबईDubaiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Dubai crown prince sheikh hamdan visits india names daughter hind know reason jshd import asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.