• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. ram mandir construction layout 161 feet tall mandir in ayodhya bmh

असं असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर! पाच प्रवेशद्वार, पाच कळस, १६१ फूट उंची

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन

Updated: September 10, 2021 14:23 IST
Follow Us
  • अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)
    1/10

    अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद रामजन्मभूमी वादावर ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तर मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं न्यायालयानं आपल्या निकाल पत्रात म्हटलं होतं. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापिठानं हा निकाल दिला. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/10

    हा निकाल देतानाच सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले होते. न्यायालयाच्या निर्णयप्रमाणे केंद्र सरकारनं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास स्थापना केली. तसेच अध्यक्ष आणि विश्वस्तांची नेमणूक केली. त्यानंतर राम मंदिराचं काम सुरू होण्याच्या दृष्टीनं पावलं पडली होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/10

    मंदिर उभारणीच्या जागेचं काम काही दिवसांपूर्वी थांबवण्यात आलं होतं. भारत-चीन सीमावादाचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासची शनिवारी या संदर्भात बैठक पार पडली. ३ किंवा ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

  • 4/10

    न्यासचे सदस्य कामेश्वर चोपाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : पीटीआय)

  • 5/10

    मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत. (फोटो सौजन्य : जनसत्ता)

  • 6/10

    राम मंदिर भव्य असणार आहेच, त्याचबरोबर तीन मजली उभारण्यात येणार आहे. सीता रसोई येथेच सीता मंदिर उभारण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

  • 7/10

    मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या दगडांचा शोध घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत ८० हजार घनफूट दगड घडवण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

  • 8/10

    राम मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मंदिराचं लेआउट फायनल झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होणार आहे. (फोटो सौजन्य : जनसत्ता)

  • 9/10

    राम मंदिराच्या बांधकामासाठी अंदाजित खर्च ३०० कोटी रुपये इतका असणार आहे. तर परिसरातील २० एकर जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल एक हजार कोटी इतका खर्च असणार आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस)

  • 10/10

    मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमी न्यास देशभरातून निधी उभारणार आहे. यासाठी २५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधी निधी उभारण्याचं काम केलं जाणार आहे. यात १० कोटी कुटुंबापर्यत न्यास जाणार आहे. (फोटो सौजन्य : जनसत्ता)

Web Title: Ram mandir construction layout 161 feet tall mandir in ayodhya bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.