-
चहाची वेळ नसते पण वेळेला चहा हवाच हे आपण सर्वांनी अनुभवलं असेलच. ‘चहा’ हा जणू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. एक कटिंग चहा घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरूवातही होत नाही. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चहाबद्दल अशा काही रंजक गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील. तर जाणून घेऊयात चहाबद्दल थोडक्यात.
-
चहा हे पाण्यानंतर सर्वाधिक प्यायले पेय आहे.
-
चहा हे ब्रिटिशांचं पेय मानलं जात असलं तरी तसं नाही. त्याचं मूळ प्राचीन चीनशी जोडलं जातं.
-
चहाचा शोध हा अपघातानं लागला असल्याचे संदर्भ आढळतात. इसवी सन पूर्व २७३७ मध्ये चिनी सम्राट सेन नूंग यांनी चहाचा शोध लावला. अपघातानं चहाची पानं गरम पाण्यात पडली आणि चहाचा शोध लागला.
-
हल्ली टपरीवर चहा पिण्यासाठी आपण पाच ते दहा रुपये मोजतो. पण तुम्हाला एक गंमत माहितीये का? पूर्वी चहा हे सर्वात महागडे पेय होते. इतकेच नाही तर चहापावडर पूर्वी कपाटात बंद करून ठेवली जायची. त्याची चावी घरमालकीणीकडे असायची त्यामुळे चहाच्या सुरक्षतेची जबाबदारी ही पूर्णपणे तिची होती.
-
आपण उठसूट कधीही चहा पित असलो तरी इंग्लडमध्ये पूर्वी चहापानाचा कार्यक्रम नेहमी ३ ते ६ मध्ये पार पाडायचा.
-
चहाचं सर्वाधिक उत्पन्न हे चीनमध्ये घेतलं जायचं. यापैकी सर्वाधिक चहा ही ब्रिटनमध्ये निर्यात केला जायचा.
-
युएईमध्ये सर्वाधिक चहाचं प्राशन केलं जातं.
चहाच्या क्षेत्रातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली आणि भारतीयांना खऱ्या अर्थाने चहाचा परिचय झाला. -
आपल्याकडेच नाही, तर जगभरात सगळीकडेच चहा हे पेय नाही तर ती एक संस्कृती आहे. माणसामाणसांना जोडून घेणारी, गरम पाण्याच्या त्या एका उबदार पेल्यात जीवनाचा प्रवाह वाहता ठेवणारी संस्कृती.
International Tea Day : एकीकाळी चहापावडर सोन्याइतकीच मैल्यवान होती
Web Title: International tea day know about tea history health benefits facts information tea lovers sdn