-
करोनाची दुसरी लाट धडकल्यापासून गेले दोन महिने निर्बंधांत जखडलेल्या मुंबईतील बहुतांश व्यवहार गेल्या सोमवारपासून (७ जून) खुले झाले.
-
मात्र, निर्बंधांच्या सावटातून बाहेर पडलेल्या आर्थिक राजधानीवर अतिवृष्टीचा इशारा देत काळ्या ढगांनी गर्दी केली.
-
गेल्या आठवड्यातील दोन दिवस झोडपून काढणाऱ्या पावसाने हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरवत रविवारी पूर्ण विश्रांती घेतली.
-
करोनासह पावसाचेही मळभ हटल्याने दोन महिन्यांनंतर प्रथमच मुंबईकरांची रविवारची सुट्टी सत्कारणी लागली.
-
मग कुणी समुद्रकिनारी बैठक मांडून खारे वारे अंगावर झेलले तर कुणी सायकलवरुन संचार केला.
-
कुणी आपल्या वाहनातून सहकुटुंब सैर केली तर कुणी मैदानात डाव मांडला.
-
अर्थात हे सगळं शिस्तीत होतंय की नाही, यावर पोलिसांची नजर होतीच.
-
(सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)
मळभ हटले अन्…
Web Title: A sunny sunday in mumbai after continue heavy rainfall gateway of india marine drive sea side offbeat photos sdn